Join us  

3860_article

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2016 1:10 PM

जगातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता म्हटल्यावर लियोनार्दो डिकॅप्रियोशी जवळीक साधायला कोणाला आवडणार नाही? अद्याप लग्न न झालेल्या लियोच्या जीवनात अनेक टॉप मॉडेल्स आल्या आहेत. तुम्हीच पाहा यामध्ये कोण कोण आहे...

जगातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता म्हटल्यावर लियोनार्दो डिकॅप्रियोशी जवळीक साधायला कोणाला आवडणार नाही? अद्याप लग्न न झालेल्या लियोच्या जीवनात अनेक टॉप मॉडेल्स आल्या आहेत. तुम्हीच पाहा यामध्ये कोण कोण आहे...आयरिश टीव्ही प्रेझेंटर लॉरा व्हिटमोर आणि लियो बाफ्टा अ‍ॅवॉर्डनंतर एकत्र डान्स करतान दिसले. लियोने तिला त्याच्या हॉटेलरुममध्ये येण्यासाठीसुद्धा विचारल्याची बातमी गॉसिप कॉलममध्ये झळकली होती.यावर्षी जानेवारी महिन्यात पॉप सिंगर रिहाना आणि लियो पॅरिसमध्ये एकत्र पार्टी करताना दिसले. गेल्या फेब्रवारीत दोघे डेट करत असल्याची अफवा पसरली होती.डी१ गोल्फर आणि स्पोर्ट्स इल्युस्ट्रेटेड मॉडेल केली रोहरबॅचसोबत लियोचे अफेयर चांगलेच गाजले. दोघांची एंगेजमेंट झाल्याचीदेखील चर्चा होती. मात्र, या वर्षीच्या सुरुवातीला त्यांचे ब्रेक अप झाले.आणखी एका व्हिक्टोरियाज् सिक्रेट मॉडेल टोनी गार्नला एक वर्ष डेट केल्यानंतर लियोचे ब्रेक अप झाले. त्यानंतर मियामी नाईटक्लबमध्ये २० मुलींसह पार्टी करताना त्याला पाहिले गेले.व्हिक्टोरियाज् सिक्रेट मॉडेल एरिन हिदरटन आणि लियो २०१२मध्ये दहा महिने डेट करत होते. परंतु त्याच्या अतिव्यस्त वेळापत्रकामुळे त्यांचे नाते टिकूू शकले नाही.ब्लेकशी ब्रेक अप झाल्यानंतर आॅस्ट्रेलियात ‘द ग्रेट गॅटस्बी’ चित्रपटाची शुटिंग करताना त्याची मँडिलिना घेनियाशी भेट झाली होती.ब्लेक लाईव्हली लियोच्या घरी जाऊन त्याच्यासाठी जेवण तयार करत असे. स्वयंपाक करता येणाºया मुलीशी पहिलेच अफेयर म्हणून दोघांचा रोमॅन्स ओळखला जातो. परंतु केवळ पाच महिनेच तो टिकू शकला.२००९ साली बार रफेलीशी ब्रेक झाल्यानंतर अ‍ॅने व्यालिट्सस्याएना या रशियन व्हिक्टोरियाज् सिक्रेट मॉडेलशी जवळीकता वाढली. स्पेनमधील इबिझा बीचवर दोघे मौजमस्ती करताना दिसले होते.व्हिक्टोरियाज् सिक्रेट मॉडेल बार रफेलीसोबत २००५ ते २०११ या दरम्यान लियोचे अधूनमधून नाव जोडले जायचे. ती अ‍ॅक्टिव्हिस्ट असल्याने लियो आणि तीची ओळख वाढली होती.मॉडेल नताशा हेनस्ट्रिजसोबत लियोची ‘टायटॅनिक’नंतर जवळीकता वाढली होती. तिला ‘स्पेसिज’ चित्रपटात प्रमुख भूमिका मिळवून देण्याचा त्याची खूप मदत झाली होती.