'अरुंधती' फेम मधुराणीच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का? लाइमलाइटपासून राहते दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 13:37 IST
1 / 8अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेनंतर तिचा फॅन फॉलोव्हिंग खूप वाढला आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात.2 / 8मधुराणी प्रभुलकरच्या पती आणि मुलगीबद्दल सर्वांनाच माहित आहे. क्वचितच काही लोकांना मधुराणीच्या सख्ख्या बहिणीबद्दल माहित आहे. तिच्या बहिणीचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे.3 / 8मधुराणीच्या धाकट्या बहिणीचं नाव आहे अमृता गोखले-सहस्रबुद्धे (Amruta Gokhale-Sahastrabuddhe). आज तिचा वाढदिवस असून या निमित्ताने अभिनेत्रीने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.4 / 8मधुराणीने अमृतासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, एका अद्भुत बहिणीला, काळजीवाहू आईला, उत्कृष्ट गायिका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक सशक्त स्त्रीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.5 / 8अमृता ही गायिका असून तिने झी मराठी वाहिनीवरील सारेगमपा शोच्या पहिल्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. इतकेच नाही तर ती अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती.6 / 8याशिवाय अमृताचे स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे आणि त्यावर बरीच कव्हर साँग्स ऐकायला मिळतील. 7 / 8अमृताला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. अमृताच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर तिचे आणि मधुराणीचे बरेच फोटो पाहायला मिळत आहेत.8 / 8मधुराणी प्रभुलकरने मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही ती पाहायला मिळाली आहे.