1 / 13 आपल्या अदांनी, मनमोहक हास्याने प्रेक्षकांना रिझवणारी माधुरी आज 53 वर्षांची झाली.2 / 13 3 एप्रिल 1992 रोजी ‘बेटा’ रिलीज होण्यापूर्वी माधुरी केवळ माधुरी दीक्षित होती. पण या चित्रपटातील धक धक करने लगा... या गाण्यानंतर ती बॉलिवूडची धकधक गर्ल बनली. तिच्या या गाण्याने प्रेक्षकांना जणू वेड लावले़.3 / 131988 मध्ये ‘दयावान’ या चित्रपटात तिच्यापेक्षा 21वर्षांनी मोठ्या असणा-्या अभिनेता विनोद खन्नासोबत केलेल्या किसिंग सीनमुळे ती चर्चेत आली होती. 4 / 13‘एक दो तीन’ मुळे प्रसिद्ध झालेला ‘तेजाब’ या चित्रपटातून माधुरीच्या करिअरच्या यशाचा आलेख वाढत गेला. 5 / 13माधुरीला बालपणी डॉक्टर बनण्याची इच्छा होती. 6 / 13 तीन वर्षाची असताना तिने नृत्य शिकण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिने आपल्या बहिनींसोबत डान्स क्लास घेण्यास सुरूवात केली. 7 / 13सुरूवातीच्या काळात माधुरीचे नाव अभिनेता अनिल कपूरपासून अभिनेता संजय दत्तपर्यंत जोडले गेले. मात्र त्याचे नाते फार काळ टिकले नाही. 8 / 131999 मध्ये तिने डॉ़ राम नेने यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.9 / 13 माधुरी केवळ अभिनेत्री नाही तर बॉलिवूडची डान्सिंग क्वीनही आहे.10 / 13 माधुरीला भटकंतीचीविशेष आवड आहे. शिवाय खाण्यापिण्याचीही ती शौकीन आहे.11 / 13 माधुरीने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपट दिलेत. 12 / 13 अनेक पुरस्कार तिने आपल्या नावावर केलेत़ पद्मश्रीनेही तिला गौरविण्यात आले.13 / 13 दोन मुलांची आई असलेल्या माधुरीने लग्नानंतर काही वर्षे ब्रेक घेतला.