By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 12:24 IST
1 / 8आज बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदाचा वाढदिवस. २१ डिसेंबर १९६३ मध्ये त्याचा मुंबईत जन्म झाला होता. ८० आणि ९० च्या काळात गोविंदा ज्याही सिनेमाला हात लावत होता तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर होत होता. गोविंदा जबरदस्त कॉमेडीसोबतच अॅक्शन आणि डान्ससाठी ओळखला जात होता. 2 / 8गोविंदाला 'इल्जाम' या सिनेमातून लॉन्च करण्यात आलं होतं. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री नीलम होती. त्यानंतर दोघांनी अनेक सिनेमे सोबत केले. अनेक वर्ष दोघांच्या अफेअरची चर्चाही रंगली. असंही सांगितलं जातं की, गोविंदाने नीलमसाठी त्याचा सुनीतासोबतचा साखरपुडाही मोडला होता.3 / 8असं सांगितलं जातं की, नीलम आणि गोविंदाचं बरीच वर्ष अफेअर होतं. पण सुनीता ती तरूणी होती जिच्यावर गोविंदा पहिल्या नजरेतच प्रेम करू लागला होता. पण तो नंतर नीलमच्या जवळ आला.4 / 8एका मुलाखतीत गोविंदा म्हणाला होता की, 'मी घरीही नीलमबाबत बोलत राहत होतो. सुनीतासोबत नातं जोडल्या गेल्यावर तर मी तिलाही नीलमसारखं होण्याबाबत सांगत होतो. मी सुनीताला सांगत होतो की, तू नीलमकडून काही शिकली पाहिजे. यामुळे सुनीता चिंतेत राहत होती. एक दिवस सुनीता नीलमबाबत काहीतरी बोलली तेव्हा मी फारच अग्रेसिव्ह झालो आणि सुनीतासोबतचा साखरपुडाही मोडला होता'.5 / 8गोविंदा म्हणाला होता की, 'माझ्या वडिलांनाही वाटत होतं की, मी नीलमसोबत लग्न करावं. कारण त्यांनाही ती आवडत होती. पण माझी आई म्हणत होती की, मी सुनीताला शब्द दिला आहे, तो तिला पूर्ण करायचा आहे'. नीलमसोबत वेगळा झाल्यावर गोविंदाने सुनीतासोबत लग्न केलं. 6 / 8पण गोविंदाने एक वर्षापर्यंत लग्न केल्याचं लपवून ठेवलं. कारण त्याला वाटत होतं की, याने त्याच्या लोकप्रियतेवर प्रभाव पडेल. पण असं काही झालं नाही. दोघांची भेट एखाद्या सिनेमाच्या कथेसारखीच होती.7 / 8गोविंदाला या गोष्टीचं नेहमीच दु:खं राहिलं की, त्याने सुनीतासोबतचं लग्न सर्वांपासून लपवून ठेवलं. त्यानंतर त्याने २५व्या लग्नाच्या वाढदिवशी सुनीतासोबत पुन्हा लग्न केलं. त्याच्या आईची इच्छा होती की, मुलाला सर्व रिती-रिजावांसोबत लग्न करताना बघावं. गोविंदाने आईची इच्छा पूर्ण केली.8 / 8९० मध्ये गोविंदा इतका मोठा स्टार बनला होता की, त्याच्याकडे एकावेळी ७० सिनेमे होते. डेट्स मिळत नसल्याने त्याला अनेक सिनेमे सोडावे लागले. हिरो नंबर वन, हसीना मान जाएगी, दीवाना मस्ताना, कुली नंबर वन, साजन चले ससुराल, हद करदी आपने, शोला और शबनम...गोविंदा ९० मध्ये हिट मशीन होता. आपल्या करिअरमध्ये गोविंदाने १६५ सिनेमात काम केलं, ११ वेळा त्याला फिल्मफेअर नॉमिनेशनही मिळालं होतं.