Join us  

आई बंगाली अन् वडील जर्मन, तरी मुस्लिम आडनाव लावते 'ही' अभिनेत्री; गरोदर असतानाच केलं दुसरं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 9:38 AM

1 / 7
अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) सध्या मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. मात्र सोशल मीडियावरुन ती कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. वयाच्या 40 व्या वर्षीही दियाचे सौंदर्य घायाळ करणारे आहे. तिने काही महिन्यांपूर्वीच पतीला घटस्फोट देऊन दुसरं लग्न केले.
2 / 7
दिया मिर्झाबाबत कायम इंटरनेटवर एक गोष्ट सर्च केली जाते ते म्हणजे तिचा नेमका धर्म कोणता. तिची आई बंगाली तर वडील जर्मनचे आहेत तरी तिचं आडनाव मिर्झा म्हणजेच मुस्लिम कसं काय असा प्रश्न अनेकांना पडतो.
3 / 7
दियाचा जन्म हैदराबादमध्ये झाला. तिने टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. 2001 साली आलेल्या 'रहना है तेरे दिल मे' सिनेमामुळे ती चांगलीच लोकप्रिय झाली. या सिनेमात तिची आणि आर माधवनची जोडी खूप पसंत केली गेली.
4 / 7
यानंतर दियाने दम, लगे रहो मुन्नाभाई, संजू अशा काही सिनेमांमध्ये काम केले.मात्र नंतर तिला फारसं यश मिळालं नाही. तिने वयाच्या 18 व्या वर्षीच मिस एशिया पॅसिफिक खिताब पटकावला होता.
5 / 7
दियाची आई दीपा बंगाली हिंदू तर वडील फैंक हैडरिच जर्मनचे ईसाई आहेत. मात्र काही वर्षात तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. त्यावेळी दिया 4 वर्षांची होती. तिच्या आईने नंतर हैदराबादच्या अहमद मिर्झा यांच्याशी दुसरं लग्न केलं.
6 / 7
यानंतर अहमद मिर्झा यांनीच दियाची संपूर्ण जबाबदारी सांभाळली आणि तिचा स्वीकार केला. दिया देखील वडिलांच्या खूप जवळ आहे. म्हणूनच तिने आपले आडनाव मिर्झा असेच लावण्यास सुरुवात केली.
7 / 7
दियाने 2014 मध्ये बिझनेस पार्टनर साहिल सांगासह लग्न केले होते. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या ५ वर्षांनंतर 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर ती 2021 मध्ये वैभव रेखीसह विवाहबंधनात अडकली. त्यावेळी दिया गरोदरही होती. जुलै 2021 मध्ये तिने 'अव्यान' या मुलाला जन्म दिला.
टॅग्स :दीया मिर्झाबॉलिवूडपरिवार