त्यानंतर अजून काही फोटो नुकतेच लीक झाले आहेत. त्यात रणवीर आणि दीपिका हे संपूर्णपणे ब्लॅक ड्रेसमध्ये एकमेकांसोबत हॉट दिसत होते. त्याचबरोबर ते एका बाळाला खेळवत होते. दीपिकाने त्या बाळाला तिच्या दोन्ही हातांवर घेतले होते. आणि रणवीर चक्क मस्ती करत त्या बाळाला खेळवत होता.
अजून एका फोटोत ते बाळ रणवीर कडे जातांना दिसत आहे. अत्यंत क्युट अशा या फोटोंना प्रचंड लाईक्स मिळत आहेत. या फोटोंकडे पाहिल्यानंतर वाटते की, नेमकं लहान कोण आहे? ते बाळ की डिप्पी-आर व्ही?