Join us  

क्यूट स्माइल अन् हॉट लूक... धनश्री चहलचं 'स्पेशल' ख्रिसमस सेलिब्रेशन, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 7:12 PM

1 / 6
Dhanashree Verma Yuzvendra Chahal wife Christmas celebration : टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल यांची पत्नी धनश्री वर्मा सतत तिच्या डान्स किंवा बोल्ड फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते.
2 / 6
धनश्री ही युजवेंद्र चहलशी लग्न झाल्यानंतर जास्त लोकप्रिय झाली हे खरं असलं तरी ती एक उत्तम डान्सर आणि फिटनेस फ्रीक आहे हे तितकंच खरं आहे.
3 / 6
एखादा सण-उत्सव असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील एखादी घटना असो, धनश्री आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच याबाबत सक्रिय असते.
4 / 6
डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून साऱ्यांनाच नाताळ आणि नववर्षाचे वेध लागतात. धनश्री देखील ख्रिसमस सेलिब्रेशन करताना दिसली. याबद्दलचे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
5 / 6
फोटोशूटमध्ये धनश्रीने सुंदर असा पांढऱ्या रंगाचा फ्लोरल वन पीस घातला असून त्यावर छानशी सांताक्लॉझ हॅट घातली आहे. धनश्रीचे सुंदर हास्य या पेहरावावर अधिकच खुलून दिसत आहे.
6 / 6
धनश्रीने आपल्या घरात नाताळ विशेष अशी ख्रिसमस ट्री सजवली आहे. त्यासोबतच तिने त्या ख्रिसमस ट्री वर छान छोटी छोटी गिफ्ट लावली असून त्यासोबत फोटोशूट केलं आहे.
टॅग्स :युजवेंद्र चहलनाताळइन्स्टाग्रामसामाजिकव्हायरल फोटोज्