सोनम कपूरच्या राल्फ एंड रुसोच्या व्हाईट लाँग गाऊनची तुलना रुमाली रोटीशी होत असली तरी त्याआधीच्या तिच्या लूक्सचीही बरीच चर्चा झाली. डिझायनरर रिमझिम दादू यांनी डिझाईन केलेली काळ्या आणि निळ्या रंगाची साडी परिधान करुन ती रेड कार्पेटवर अवतरली. ही साडी खास पोस्टर प्रिंटमध्ये डिझाईन करण्यात आली होती.. त्यामुळं सोनमचा हा अंदाज सा-यांनाच भावला.
अभिनेत्री मल्लिका शेरावतनंसुद्धा कान्सच्या रेड कार्पेटवर आपल्या लूक्सनं घायाळ केलं. ती लेबनानच्या डिझायनरनं तयार केलेला गाऊन परिधान करुन ती रेड कार्पेटवर अवतरली. या गाऊनची खास बात म्हणजे त्यावर निळ्या रंगाची फ्लोरल प्रिंट होती.
अभिनेत्री रिचा चढ्ढानंही कान्समध्ये हजेरी लावली. तिच्या अनोख्या ड्रेसनंही उपस्थितांमध्ये चर्चा घडवून आणली. हिरव्या रंगाच्या ड्रेसवर खास वॉल पेपर प्रिंट पाहायला मिळाली.
अभिनेत्री ऐश्वर्या रायनंही रामी कादी यांचा फ्लोरल इम्ब्रोडरीवाला गाऊन परिधान केला होता.त्यामुळं यंदाच्या कान्समध्ये कर्टन प्रिंटचाच बोलबाला पाहायला मिळाला.