या सोहळ्यात सनी व्यतिरिक्त सलमान खान, करिना कपूर यांनीही धमाकेदार परफॉर्मन्स केला. सलमानचा परफॉर्मन्स तर प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करणारा ठरला. गेल्या काही दिवसांपूर्वी सनी तेव्हा चर्चेत आली जेव्हा ती पतीसोबत मॅक्सिकोच्या बिचवर बिकिनी अंदाजात मस्ती करताना दिसली. त्यावेळी सनीचे बिकिनी फोटो जबरदस्त व्हायरल झाले होते. आता या परफॉर्मन्समुळे सनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
सनीच्या परफॉर्मन्सनी अनेकांवर मोहिनी टाकली तर करिना कपूर खान, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, वरुण धवन यांच्या परफॉर्मन्सनी अनेकांची मने जिंकली. करिनाने तर सलमान, आमिर, शाहरूख आणि सैफ या चारही खानचा एक ट्रिब्यूट दिला. यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांनी भावनिक श्रद्धांजली दिली, ज्यांचे २०१६ मध्ये निधन झाले. तर आलिया भट्ट हिने करण जोहरच्या यश आणि रूही या जुळ्या मुलांचे स्वागत केले. यावेळी सलमानने श्रीदेवीच्या आगामी ‘मॉम’ या चित्रपटाचा लोगो रिलीज केला.