त्यामुळे सध्या दोघेही मॉरिशसमध्ये शूटिंगच्या कामात व्यस्त आहेत. मॉरिशस हे निसर्गरम्य आणि हॉलिडे साजरे करण्यासाठीचे एक उत्तम पर्यटनस्थळ असल्याने जरीन येथील बिचवर चांगलीच धमाल करीत आहे. तिची गौतमसोबत चांगली केमिस्ट्री जुळली असून, दोघेही शूटिंग अविस्मरणीय करण्याच्या प्रयत्नात आहेत. जरीनला स्थानिक जेवणाने अक्षरश: वेड लावले असून, ती दररोज येथील नव्या हॉटेलमध्ये जाणे पसंत करीत आहे. तसेच बिचवर फिरायला जाणेही तिला खूप आवडत आहे. अर्थात तिला गौतमची कंपनी आहेच.
या चित्रपटाच्या आॅडिशनसाठी गौतम आणि जरीन सलमानच्या गाण्यांवर परफॉर्म करताना बघावयास मिळाले होते. यामध्ये जरीन खूप हॉट दिसत होती. या चित्रपटातून तिच्या अदा प्रेक्षकांना कितपत भावतील, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.