गत महिन्यात झहीर व सागरिका या दोघांनी सोशल मीडियावर ते एंगेज असल्याचे जाहिर केले होते. अर्थात त्यावेळी झहीरच्या आयपीएलच्या व्यस्ततेमुळे साखरपुडा होऊ शकला नव्हता.
सागरिकाने शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावली होती. या चित्रपटात तिला एका क्रिकेटची गर्लफ्रेंड दाखवण्यात आले होते. खºया आयुष्यातही जोडीदार निवडताना सागरिकाने क्रिकेटरचीच निवड केली.
ALSO READ : सागरिकाला भावतो झहीरचा ‘क्लिन लूक’!
सागरिका आणि झहीरची ओळख त्याच्या एका कॉमन फ्रेंडने करुन दिली होती. दोघे एकमेकांना जवळपास एक दीड वर्ष डेट करत होते. मात्र याची भनक ही कोणाला लागली नव्हती. त्यानंतर काही सार्वजनिक ठिकाणी या दोघांना एकत्र पाहण्यात आले आणि यांच्या नात्याबाबत चर्चा सुरु झाली होती. युवराज आणि हेजलच्या लग्न समारंभात झहीर आणि सागरिका एकत्र आले होते. यानंतर त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चेला उधाण आले होते. अखेर या चर्चांचा झहीरने पूर्णविराम देत तो सागरिकासोबतएंगेज असल्याचे जाहिर केले होते. आता या सुंदर जोडप्याला भावी आयुष्याच्या शुभेच्छा देऊ यात आणि या जोडप्याच्या आनंदात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींचे काही फोटो पाहुयात!