तुझ्या डेटिंगबद्दल अनेक चर्चा ऐकायला येत आहेत, यात काही तथ्य आहे का? असा प्रश्न अरबाजला विचारण्यात आला. यावर अरबाजने कुठलेही आढेवेढे न घेता, सगळे सांगून टाकले.
डेट? कुणाला? येलोला म्हणत असाल तर ती माझी केवळ एक चांगली मैत्रिण आहे, एवढेच मी सांगेल. मी जेव्हा केव्हा गोव्यात जातो, तिला भेटतो. ती एका रेस्टॉरंटची मालक आहे, असे तो म्हणाला. ही यॅलो रोमानियाची राहणारी आहे का? असा प्रश्न यानंतर अरबाजला विचारला गेला. यावर अरबाज जे बोलला ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. नाही, ती वेगळी आहे. तिचे नाव अलेक्झेंड्रिया आहे. ती माझी मैत्रिण आहे. मी तिच्यासोबत डेट करतोय का? असे विचाराल तर होय, मी डेट करतोय. पण आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये नाही. असे व्हायला अद्याप बराच वेळ आहे, असे अरबाज म्हणाला.
एकंदर काय, तर अरबाजच्या आयुष्यात एका रोमानियन ब्युटीची एन्ट्री झाली आहे. आता ही रोमानियन ब्युटी अरबाजचे आयुष्य किती ‘सुंदर’ करते, ते बघूच.