Join us  

यामीच्या अदा पाहुन व्हाल तिच्यावर फिदा, आयुष्यमानसोबत बॉलिवूडमध्ये केला होता डेब्यू

By नजीर शेख | Published: April 29, 2020 6:00 AM

1 / 9
यामी गौतमने खूपच कमी काळात तिची बॉलिवूडमध्ये एक खास जागा निर्माण केली आहे.
2 / 9
उरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटातील यामीच्या भूमिकेलाही रसिकांनी पसंती दर्शवली होती.
3 / 9
यामी गौतमने आयुष्यमान खुरानासह 'विक्की डोनर' सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
4 / 9
यामीच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
5 / 9
‘काबील’, ‘सनम रे’,‘जुनूनियात’,‘विकी डोनर’,‘बदलापूर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारून यामीने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
6 / 9
'काबिल' या चित्रपटातील हृतिक रोशन आणि यामीच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती.
7 / 9
यामीचे वडील पंजाबी चित्रपटाचे दिग्दर्शक असून तिची बहीण सुरीली गौतमने पॉवर कट या चित्रपटाद्वारे काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
8 / 9
मुळची हिमाचल प्रदेशमधील विलासपूरमधील असलेली यामी सध्या तिच्या कामाच्या निमित्ताने मुंबईत राहाते.
9 / 9
बाला या चित्रपटात यामी काही महिन्यांपूर्वी झळकली होती.
टॅग्स :यामी गौतम