लाल रंगाचा फ्रॉक घातलेली श्रद्धा आणि काळ्या रंगाच्या पँट, शर्टमध्ये आलेला आदित्य रॉय कपूर यांनी शोदरम्यान एन्ट्री केली तेव्हा या रोमँटिक कपलला एकत्र पाहून उपस्थितांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. शोच्या सुत्रसंचालकाने त्यांना त्यांच्या आवाजातील एखादं गाणं पेश करण्याची विनंती केली तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता हे जोडपं उठून स्टेजवर गेलं आणि सर्वांना कर्णसुख देणारं गायन सादर केलं. प्रथितयश गायक गायन करत असल्याचा भास उपस्थित प्रेक्षकांना यावेळी झाला. थोडक्यात काय, तर ‘प्रमोशन’ के लिए कुछ भी करेगा...असेच म्हणावे लागेल. स्टेजवर गाणं म्हणतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
‘ओके जानू’ हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून सध्या त्याच्या प्रमोशनमध्ये हे दोघे व्यस्त आहेत. हे ‘आशिकी २’ कपल पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेय. ‘ओके जानू’ हा चित्रपट मनी रत्नमच्या ‘ओके कन्मनी’ चा हिंदी रिमेक आहे. या ‘एक विलेन’ जोडीला प्रेक्षकांना पुन्हा एकदा आॅनस्क्रीन पाहायला मिळणार म्हणून ते उत्साहित आहेत. पाहूयात, या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना कितपत भावतेय ते!