Join us  

'सनम बेवफा' सिनेमातून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री 'चांदनी' आता कुठे आहे आणि काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 12:47 PM

1 / 9
१९९१ मध्ये दिग्दर्शक सावन कुमार यांचा सनम बेवफा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात सलमान आणि चांदनी ही जोडी दिसली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या सिनेमानंतर सलमान खानचं करिअर चांगलंच बहरलं होतं. पण चांदनी बॉलिवूडमध्ये फार काही कमाल दाखवू शकली नाही.
2 / 9
या सिनेमात सलमान खान आणि चांदनी सोबतच प्राण, डॅनी, पुनीत इस्सार, पंकज धीर, दीना पाठक, कंचन आणि जगदीप यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या. यात सलमानने सलमानची आणि चांदनीने रूखसारची भूमिका साकारली होती.
3 / 9
सावन कुमार यांनी दिग्दर्शित केलेला सनम बेवफा १९९१ मधील ५वा सर्वात हिट ठरलेला सिनेम होता. हा सिनेमा साजन, फूर और कांटे, हम आणि सडक नंतर सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा होता. हा सिनेमा २५ लाख रूपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता. तर बॉक्स ऑफिसवर सिनेमाने ६ कोटी रूपयांची कमाई केली होती.
4 / 9
चांदनीने या सिनेमात रूखसारची भूमिका साकारली होती. चांदनीचं खरं नाव नवोदिता शर्मा आहे. तिचा जन्म दिल्लीत झाला होता. आई-वडील पंबाजचे राहणारे होते, त्यामुळे जास्त जीवन दिल्ली आणि पंजाबमध्ये गेलं.
5 / 9
चांदनी दिल्लीच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तेव्हा तिने सनम बेवफाची एक जाहिरात पाहिली होती. निर्माते नव्या हिरोईनच्या शोधात होते. तर हिरो सलमान खान होता. तेव्हा सलमान खानचा 'मैने प्यार किया' हिट झाला होता. त्यामुळे तरूणाईत त्याची क्रेझ होती. चांदनीने ऑडिशनसाटी फॉर्म भरला आणि तिला मुख्य भूमिका मिळाली.
6 / 9
निर्माता-दिग्दर्शक सावन कुमारसोबत कॉन्ट्रॅक्ट असल्याने चांदनी काही वर्ष बॉलिवूडचे इतर सिनेमे करू शकली नाही. त्यामुळे ती तिचं वेगळं स्थानही बनवू शकली नाही. कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर ती हेन्ना, जान से प्यारा, आजा सनम, मिस्टर आझाद, जय किशन, इक्के पे इक्का यांसारख्या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली.
7 / 9
चांदनीने १९९४ मध्ये अमेरिका बेस्ड बिझनेसमन सतीश शर्मासोबत लग्न केलं होतं. १९९६ मध्ये ती शेवटची 'हाहाकार' या बॉलिवूड सिनेमात दिसली होती. त्यानंतर तिने बॉलिवूड नेहमीसाठी सोडलं. चांदनी सध्या तिच्या फॅमिलीसोबत फ्लोरिडामध्ये राहते. तिला दोन करिश्मा आणि करिना मुली आहेत.
8 / 9
चांदनी सध्या फ्लोरिडामध्ये ऑरलॅंडोमध्ये 'C Studios' डान्स स्कूल चालवते. इथे ती मुलांना भारतीय डान्स शिकवते. तिने तिच्या या डान्स स्टुडिओच्या माध्यमातून आतापर्यंत यूनिव्हर्सल स्टुडिओ, हार्ड रॉक आणि डिज्नीच्या हाऊस ऑफ ब्लूजमध्ये कार्यक्रम आयोजित केले आहेत. अनेक इव्हेंट्सही ती घेत असते. (Image Credit : Youtube)
9 / 9
टॅग्स :सनम बेवफाबॉलिवूडसेलिब्रिटीसलमान खान