सनी लिओनीचा खुलासा - दुसऱ्यांसोबत Adult सिनेमात काम करताना पाहून पतीची काय असायची रिअॅक्शन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 16:32 IST
1 / 11बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने भारतात आपल्या करिअरची सुरूवात वादग्रस्त शो बिग बॉसमधून केली होती. सनी लिओनीने आपल्या क्यूट अदांजाने बिग बॉसमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. 2 / 11शोमध्ये एका टास्क दरम्यान सनीने खुलासा केला होता की, एक अॅडल्ट स्टार आहे. यानंतर सनीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. खूप टिका झाली तरी तिने इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. 3 / 11सिनेमे असो रिअॅलिटी शो असो सनी लिओनी आपल्या बोल्ड लूक्समुळे आणि डान्समुळे लवकरच हिट झाली. बिग बॉसनंतर सनीला अनेक सिनेमे आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम मिळालं.4 / 11प्रोफेशनल लाइफसोबतच ती तिच्या खाजगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहते. सनीने डॅनिअल वेबरसोबत लग्न केलं आणि दोघेही सध्या ती लेकरांचे पालक आहेत. दोन मुलं सरोगसीच्या माध्यमातून तर एक मुलगी निशा त्यांनी दत्तक घेतली.5 / 11अनेक इंटरव्ह्यू आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये सनी लिओनी आपल्या पतीचे आभार मानले आहे. ह्यूमन्स ऑफ बॉम्बेसोबत बोलताना सनी लिओनीने सांगितले की, कशाप्रकारे दोघांची भेट झाली होती.6 / 11 तसेच हेही सांगितले की, सनी दुसऱ्या अॅडल्ट स्टारसोबत शूट करत असताना वेबरला काय वाटत होतं.7 / 11सनीने सांगितले की, 'तो मला समजून घेत होता आणि फार सपोर्टिव होता. मला दुसऱ्या पुरूषांसोबत अॅडल्ड सिनेमात काम करताना पाहून तो अस्वस्थ होत होता. त्यानंतर त्याने माझ्यासोबत काम करणं सुरू केलं. आणि आम्ही आमची कंपनी सुरू केली'.8 / 11सनी लिओनीने सांगितले की, 'आमची भेट वेगासमधील एका क्लबमध्ये झाली होती. ही भेट त्याच्या बॅंडमेटच्या माध्यमातून झाली होती. डेनिअल म्हणतो की, तो पहिल्या नजरेत माझ्या प्रेमात पडला होता. पण माझ्यासोबत असं काही झालं नव्हतं. कारण आम्ही फार कमी वेळ बोललो होतो'.9 / 11सनीने हेही सांगितले की, कशाप्रकारे डॅनिअलने तिचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ई-मेल आयडी मिळवला होता. सनीने सांगितले की, त्याच्याकडे मोबाइल नंबर असूनही तो तिला ई-मेल करत होता.10 / 11सनी लिओनीने अनेक सिनेमात काम केलं आहे. सुपरस्टार शाहरूख खानच्या 'रईस' सिनेमातही तिने आयटम नंबर केलाय. तर काही सिनेमांमध्ये तिने मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या. 11 / 11