Join us  

सतत बोल्ड भूमिकाच ऑफर व्हायच्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं बॉलिवूड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 4:13 PM

1 / 11
करियरच्या सुरुवातीपासूनच रियाकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या.
2 / 11
रियाला सेक्सी भूमिकांचा वीट आला होता.त्यामुळेच अशा भूमिका मला नको असंच जाहीर करुन टाकलं.
3 / 11
सेक्सी या शब्दाचा अर्थच नेमका काय हे आजवर कुणालाच कळला नाही असं रियाने म्हटले होते.
4 / 11
हिंदी सिनेमा दिग्दर्शकांना वाटतं की आपण कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं. मात्र या सगळ्या गोष्टींना सेक्सी म्हणत नाहीत.
5 / 11
सेक्सी म्हणजे एखाद्या व्यक्तीची पर्सनालिटी.आपल्याला कुणीही सेक्सी म्हटलं तर आवडेल.
6 / 11
तरीही बॉलीवुडच्या सिनेमात काम करताना फार मजा आली नसल्याचं रियाने स्पष्ट केले होते.
7 / 11
त्यामुळेच तिने आपला मोर्चा इतर भाषिक सिनेमाकडे वळवला. बंगाली दिग्दर्शकांनी आपल्याला चांगल्या भूमिका ऑफर केल्या.
8 / 11
त्या भूमिकांमध्ये काही तरी वेगळं सांगण्यासारखं होतं. केवळ लोकांना सेक्सी आवडतं म्हणून कमी कपड्यात मला दाखवणं असं त्यांनी काही केलं नाही.
9 / 11
ज्यावेळी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं त्यावेळी लहान होतो आणि फारशी जाण नव्हती. इथलं वातावरण, लोक यांची माहिती नव्हती.
10 / 11
काळानुरुप वयानुसार आपल्यात बदल झाले असून चांगलं काय, वाईट काय याची समज आल्याचं तिने सांगितले आहे.
11 / 11
आगामी काळात काही तरी वेगळेपण, नाविन्य असलेल्या भूमिका ऑफर झाल्या तरच स्विकारणार असल्याचे तिने म्हटले होते.
टॅग्स :रिया सेन