'सरबजीत' या आगामी सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी ऐश कान्समध्ये रविवारी अवतरली. यावेळी ऐशनं रामी कादी यांचा फ्लोरल इम्ब्रोडरीवाला गाऊन परिधान केला होता. यावेळी ऐशनं भडक अशी जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती. मात्र ऐशचा हा अंदाज फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
ऐशचा हा लूक अनेकांना खटकला. त्यामुळं ट्विटरवर फॅन्सनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. एका नेटिझननं ऐश्वर्याच्या या लिपस्टिकला 'ब्लॅक करंट आईस्क्रीमची' उपमा दिली आहे.
आणखी एका ट्विटर यूजरनं तर ऐशची बरीच खिल्ली उडवली आहे.तुझ्या लिपस्टिकला 'कधी एशियन पेंट्सनं स्पॉन्सर केला आहे का' ? असा सवाल या यूजरनं ऐशला विचारलाय.एकानं तर ऐश 'गुलाब जामुन खाऊन रेड कार्पेटवर आलीस का' ? असा प्रश्न विचारत थट्टा उडवलीय.
दुसरीकडे सोनम कपूरही कान्समध्ये राल्फ एंड रुसोच्या व्हाईट लाँग गाऊनमध्ये अवतरली होती. मात्र तिच्या या लूकचीही सोशल मीडियावर बरीच खिल्ली उडवण्यात येतेय. एका ट्विटर यूजरनं तर सोनमच्या या व्हाईन गाऊनची तुलना रुमाली रोटीशी केलीय.