किस्सा : ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या आदल्या रात्री 'जान्हवी'ने उडवली होती बच्चन कुटुंबाची झोप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 08:00 IST
1 / 11अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात आवडतं कपल. दाेघंही आपल्या संसारात आनंदी आहेत. पण २००७ ची ती घटना आठवून अभिषेकला कदाचित आजही घाम फुटत असावा.2 / 11अभिषेक व ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात होते. अमिताभ व जया बच्चन यांची संमती मिळाली आणि दोघांच्या लग्नाचा दिवस उजाडला.3 / 11 20 एप्रिल 2007 मध्ये बच्चन कुटुंबीयांच्या 'प्रतिक्षा' बंगल्यावर या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. पण या लग्नाच्या आदल्या रात्री एक अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंबाची झोप उडाली होती.4 / 11होय, एकीकडे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच बच्चन कुटुंबायांच्या घरासमोर घडलेल्या एका घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली होती.5 / 11१९ एप्रिलच्या त्या रात्री एक मॉडेलनं प्रतिक्षा बंगल्याबाहेर जोरदार राडा केला होता. तिचं नाव होतं जान्हवी.6 / 11मी अभिषेकची पत्नी आहे, त्याने माझ्याशी लग्न केलंय, असं म्हणत तिने पुरता गोंधळ घातला होता. इतकंच नाही तर आपल्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.7 / 11एकीकडे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाची तयारी सुरू होती आणि घरासमोर घडलेल्या एका घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली होती. बच्चन कुटुंबाचंही टेन्शन वाढलं होतं.8 / 11'दस' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान माझ्यात व अभिषेकमध्ये जवळीक वाढली. त्याने माझ्याशी लग्न केलं, असा दावा करणाऱ्या या मॉडेलनं अभिषेकवर अनेक गंभीर आरोप केले होते. 9 / 11 मॉडेल जान्हवीने अभिषेकसोबत 'दस बहाने' या गाण्यात काम केलं होतं. अभिषेकशी लग्न केल्याचे पुरावे मागितल्यावर ‘प्यार को किसी सबूत की जरूरत नहीं होती’ असं फिल्मी उत्तर तिने दिलं होतं.10 / 11आपली कोणीही दखल घेत नसल्याचं पाहून जान्हवी पोलिस ठाण्यात पोहोचली. पण तिथे तिच अडकली. पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली तिला तुरुंगात डांबलं.11 / 11हे प्रकरण कसंबसं निस्तरलं. अभिषेकला पती म्हणणारी ती मॉडेल सध्या कुठे आहे, काय करतेय, ते ठाऊक नाही. पण अभिषेकसह अख्ख्या कुटुंबाला तिने चांगलाच घाम फोडला होता, हे मात्र नक्की.