भाग्यश्री
'मैने प्यार किया, प्यार किया' म्हणत तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले. सलमान खानसोबतच्या पहिल्या सिनेमातच दमदार अभिनय करत तिने रसिकांवर जादू केली. यानंतर विविध सिनेमात भाग्यश्रीने काम केलं. मात्र मैंने प्यार किया सिनेमाची पुनरावृत्ती काही झाली नाही. यानंतर काही मोजके सिनेमा आणि मालिकांमध्ये भाग्यश्रीने काम केले. हिंदीसोबतच भोजपुरी आणि तेलुगू सिनेमातही तिने काम केले. मात्र सध्या भाग्यश्री कुठे आहे असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही.
पद्मिनी कोल्हापुरे
बॉलीवुडमधील आणखी एक गाजलेल्या अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. प्रेमरोग, विधाता, प्यार झुकता नहीं, वो सात दिन अशा एकाहून एक गाजलेल्या हिंदी सिनेमात पद्मिनी कोल्हापुरे यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. मध्यंतरीच्या काळात चिमणी पाखरं, मंथन अशा मराठी सिनेमातही त्यांचं दर्शन झाले. 'फटा पोस्टर निकला हिरो' या सिनेमात शाहिद कपूरच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती. मात्र सध्या पद्मिनी कोल्हापुरे काय करतात याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना आहे.
सलमा आगा
बॉलीवुडमधील आणखी एक प्रसिद्ध नाव म्हणजे सलमा आगा. गायिका, अभिनेत्री आणि निर्मात्या अशी वेगवेगळ्या प्रांतात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'निकाह', 'कसम पैदा करनेंवालें की', 'ऊंचे लोग' अशा विविध सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. शिवाय विविध सिनेमातील गाणी त्यांनी आपल्या सूरांनी अजरामर केली. काही वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'औरंगजेब' या सिनेमामुळे सलमा आगा चर्चेत आल्या होत्या. कारण या सिनेमात त्यांची लेक साशा आगा हिने पदार्पण केले होते. मात्र सध्या या माय-लेकी काय करतायत असा प्रश्न रसिकांना पडला आहे.
झीनत अमान
'हरे राम हरे कृष्णा' सिनेमा(1971), 'यादों की बारात', 'हिरा पन्ना' ( 1973) किंवा मग 'सत्यम शिवम सुंदरम'( 1978) या सिनेमांची गाणी आजही रसिकांना मंत्रमुग्ध करत असताता. एकसे बढकर एक सिनेमातून झीनत अमान यांनी अापल्या अभिनयानेच नाहीतर आपल्या घायाळ करणा-या अंदाजाने रसिकांवरही मोहिनी घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे 70 च्या दशतकातील हिंदी सिनेमातली सगळ्यात बोल्ड अभिनेत्री म्हणून झीनत अमान ओळखल्या जातात.'' ''लैला मै लैला'' म्हणत त्यांनी त्या काळातही आपली मोहिनी रसिकांवर घातली. आता पुन्हा एकदा त्या रूपेरी पडद्यापासून लांब असल्या तरी 'रईस' सिनेमातील सनी लिओनीवर चित्रित झालेल्या '' लैला मै लैला' हे नव्या ढंगात हे गाणे जेव्हा जेव्हा झळकते तेव्हा तेव्हा झीनत अमान यांची आजही आठवण झाल्याशिवाय राहत नाही.त्यामुळे एकीकाळी रसिकांना घायाळ करणा-या झीनत अमान यांची झलक पुन्हा कधी पाहायला मिळणार अशी आशा रसिकांना आहे.