रणबीरशी ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिना आत्ता कुठे सावरू लागली आहे. या काळात आदित्यने कॅटरिनाला सर्वाधिक आधार दिला. याचदरम्यान आदित्य आणि कॅटरिनाच्या लिंकअपच्या बातम्याही आल्या. पण दोघांनीही या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सांगत आम्ही केवळ चांगले मित्र असल्याचे सांगितले. अर्थात कालचे आदित्य व कॅटरिनाचे फोटो बघितल्यावर मात्र या दोघांमध्ये मैत्रीपलीकडे काहीतरी असल्याचेच तुम्हाला जाणवेल.
खरे तर रणबीरच्या कालच्या हाऊस वार्मिंग पार्टीत आदित्य न जाण्यामागे दोन शक्यता असू शकतात. कदाचित कॅटरिनाशी वाढलेली त्याची जवळीक बघून रणबीरने जाणीवपूर्वक आदित्यला या पार्टीचे निमंत्रण देणे टाळले असावे किंवा कॅटरिनासोबत वेळ घालवण्यासाठी खुद्द आदित्यनेच या पार्टीकडे पाठ फिरवली असावी. पण नेमक्या रणबीरच्या पार्टीच्या दिवशी कॅट व आदि एकत्र दिसणे यातच खूप काही आले. आता स्वत: आदि व कॅट हे कधी मान्य करतात, तेच आता बघायचे. तोपर्यंत जस्ट वेट अॅण्ड वॉच...