मुंबईत प्रियांका धम्माल करणार, हे तिने आधीच जाहिर केले आहे. मित्र आणि नातेवाईकांसोबत नाताळ आणि नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करण्याचा तिचा प्लान आहे. गतवर्षी शूटींगमध्ये बिझी असल्याने प्रियांकाने अमेरिकेतच ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेट केले होते. पण यंदा मात्र पीसी आपल्या जवळच्या लोकांसोबत, आपल्या चाहत्यांसोबत हा आनंद साजरा करणार आहे. यानंतर जानेवारीच्या दुसºया आठवड्यात प्रियांका पुन्हा हॉलिवूड प्रोजेक्टसाठी अमेरिकेत परतणार आहे. आता त्यापूर्वी प्रियांका भारतात काय काय धम्माल करते, ते बघूयात...!!
सध्या प्रियांका तिच्या ‘क्वांटिको २‘या मालिकेच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. लवकरच प्रियांकाचा ‘बेवॉच’ हा पहिलावहिला हॉलिवूडपट प्रदर्शित होत आहे. या हॉलिवूडपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला. अर्थात प्रियांका यात अगदी काही सेकंदांपुरती झळकली. यामुळे प्रियांकाच्या चाहत्यांची काहीसी निराशा झाली. मात्र तरिही तिच्या या पहिल्या-वहिल्या हॉलिवूडपटाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.