मिस युनिव्हर्स’च्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, टॉप १२ स्पर्धकांची पेजन्ट नाईटसाठी निवड केली जाईल. या स्पर्धेत जगभरातील ८६ सौंदर्यवती सहभागी झाल्या आहेत. सोमवारी ‘मिस युनिव्हर्स’चा ताज कुणाच्या माथ्यावर चढेल, हे कळेल. याच स्पर्धेत स्विमसूट राऊंडमध्ये रॅम्पवॉक करणा-या सौंदर्यवतींची एक झलक खास तुमच्यासाठी....
गत गुरुवारीच ‘मिस युनिव्हर्स २०१७’ या स्पर्धेची सुरुवात झाली. पहिला राऊड फिलिपाईन्सच्या पसी शहरात झाला.
ही स्पर्धा पाहण्यासाठी मॉल आॅफ एशिया एरीना पूर्णपणे पॅक झाला होता.
पहिल्या राऊंडमध्ये सर्व स्पर्धकांनी जजेसमोर इव्हिनिंग गाऊनमध्ये रॅम्प वॉक केला.
यानंतर स्विमसूट रॅम्प वॉक झाल्यानंतर पारंपरिक पोशाखातील राऊंडला सुरुवात झाली.