वास्तविक जीमला जातानाचे करिना कपूरचे बरेचसे फोटोज् आम्ही तुम्हाला दाखविले आहेत. त्यामुळे वारंवार करिनाचे फोटो दाखविण्याचा हेतू काय? असा कदाचित तुम्हाला प्रश्न पडू शकतो. परंतु करिनाच्या प्रत्येक फोटोमध्ये फरक असून, ते वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तैैमूरच्या जन्मानंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी ज्या पद्धतीने करिना धडपड करीत आहे, ते या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येते. करिनाच्या फिगरमध्ये दर दिवसाला बदल होत असल्याने तिचे बघावे तेवढे फोटो कमीच म्हणावे लागतील.
खरं तर यामागे करिनाची मेहनत असून, ती जीमला एक दिवसही ब्रेक देऊ इच्छित नाही. आजचे फोटो बघून तर हे स्पष्टच होते की, करिना स्लीम फिगर मिळविण्यासाठी किती धडपड करीत आहे. हवामान कसेही असो, पाऊस असो वा ऊन करिना वर्कआउट करण्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही. भर पावसात करिनाने जीम गाठत वर्कआउट केले.
वास्तविक करिना कपूर-खानदेखील आयफा २०१७ साठी न्यूयॉर्कला जाणार आहे. त्यामुळे जेव्हा करिना आयफाच्या कार्पेटवर एंट्री करेल तेव्हा तिच्याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील यात शंका नाही. असो, करिना आयफाला मुलगा तैमूरला घेऊन जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. जर ती तैमूरसोबत आयफाला गेल्यास तिला या सोहळ्यात कदाचित हजेरी लावता येणार नाही. त्यामुळे आयफाच्या कार्पेटवर करिना एंट्री करणार काय? याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
करिना लवकरच तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटात करिना व्यतिरिक्त सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्याही प्रमुख भूमिका असतील. हा चित्रपट बºयाच दिवसांपासून खोळंबला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात केली जावी, अशी खुद्द करिनाचीच इच्छा आहे.