मुंबई विमानतळावरील सारा आणि सुशांतचे काही फोटोज् समोर आले असून, त्यामध्ये साराचा अंदाज बघण्यासारखा आहे. यावेळी सुशांतने डेनिम जीन्स आणि टीशर्ट घातले होते. तर कॅज्युअल ड्रेसमध्ये बघावयास मिळाली. पांढºया रंगाचा शोल्डर टॉप आणि डेनिम जीन्समध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती. साराने मीडियाचे कॅमेरे बघून स्माइलही दिली. आपल्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगला जात असल्याचा आनंद तिच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसत होता. लवकरच हे दोघे देहरादून येथे ‘केदारनाथ’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.
या चित्रपटाविषयी को-प्रोड्यूसर एकताने एका मुलाखतीत म्हटले होते की, जेव्हा आम्ही कथा ऐकली तेव्हा आम्हाला असे वाटले की, यावर खूपच चांगल्या चित्रपटाची निर्मिती केली जाऊ शकते. त्यातच चित्रपटात फ्रेश चेहरा असलेली सारा असल्याने प्रेक्षकांनाही चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. सुरुवातीला या चित्रपटाविषयी अशीही चर्चा रंगली होती की, चित्रपटाची कथा २०१३ मध्ये आलेल्या ‘केदारनाथ’ दुर्घटनेवर आधारित असेल.
असो, या चित्रपटातील सारा डेब्यू करीत असून, तिच्या अभिनयाची झलक बघण्यास चाहते उत्सुक आहेत. सारा कोणत्या चित्रपटातून डेब्यू करणार याविषयी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते. सुरुवातीला करण जोहर तिला लॉन्च करणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु मम्मी अमृता सिंगने तिला ‘केदारनाथ’मध्ये काम करण्याची परवानगी दिली.