सध्या ईशा आई होण्याच्या आनंदाने हरकून गेली आहे. शिवाय तख्तानी आणि देओल परिवाराकडूनही तिची विशेष काळजी घेतली जात आहे. बºयाच वर्षांनंतर या परिवारात आनंदाचे क्षण आल्याने, सध्या दोन्ही परिवार ईशा केंद्रित झाले आहेत. दरम्यान, काल रात्री ईशा पती भरत तख्तानी याच्यासोबत विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी ती छायाचित्रकारांना सामोरे जात असताना खूपच आनंदी दिसली. शिवाय बेबी फ्लॉन्ट करताना ती अजिबातच धास्तावत नव्हती.
दरम्यान, हेमा मालिनी या दुसºयांदा आजी होणार आहे. कारण काही वर्षांपूर्वीच हेमा आणि धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहाना हिने डेरिनला जन्म दिला होता. त्यामुळे ईशानेही आपला संसार वाढवावा, अशी तिच्या आईची इच्छा होती. सध्या ईशा गर्भवती असल्याने सर्वाधिक आनंद हेमा यांच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, ईशाची जीवलग मैत्रीण शिलार्ना वेज हीदेखील गर्भवती असून, दोघीही एकत्र क्वालिटी टाइम स्पेंड करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिलार्ना हिने तिच्या इन्स्टाग्रामवर दोघांची बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचा एक फोटो शेअर केला होता. शिर्लाने हिने ‘न तुम जानो ना हम’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती.
ईशाच्या चित्रपट करिअरविषयी बोलायचे झाल्यास, तिने २००२ मध्ये आलेल्या ‘कोई मेरे दिल से पुछे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ‘धूम, युवा, दस, काल आणि टेल मी ओ खुदा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली होती. २९ जून २०१२ रोजी तिने उद्योगपती भरत तख्तानी याच्यासोबत विवाह केला.