Join us  

माझं वजन राष्ट्रीय मुद्दा ठरला होता...! विद्या बालननं सांगितला ‘द डर्टी पिक्चर’नंतरचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 10:56 AM

1 / 9
विद्या बालन बॉलिवूडची एक गुणी अभिनेत्री. पण याच गुणी अभिनेत्रीला कधीकाळी तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल व्हावे लागले होते.
2 / 9
‘द डर्टी पिक्चर’मध्ये विद्याने सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी विद्याने भरपूर वजन वाढवले होते. यानंतर काय तर तिचे वाढलेले वजन चर्चेचा विषय ठरला होता.
3 / 9
एका ताज्या मुलाखतीत विद्या यावर बोलली. माझे वाढलेले वजन जणू राष्ट्रीय मुद्दा बनला होता. तो काळ माझ्यासाठी कठीण होता. मी माझाच तिरस्कार करू लागले होते, असे ती म्हणाली.
4 / 9
माझे वाढलेले वजन, त्यावरून होणारी टीका याचा माझ्या मनावर विपरित परिणाम झाला होता. मी हे मान्य करू शकत नव्हती. माझे मानसिक स्वास्थ्य हरवले होते, असे ती म्हणाली.
5 / 9
आरशात पाहायलाही मला भीती वाटायची. माझ्या शरीराची लाज वाटायची. पण हळूहळू मी यातून बाहेर आले. अर्थात यातून बाहेर येणे इतके सोपे नव्हते. मात्र मी ते साध्य केले, असे तिने सांगितले.
6 / 9
आता लोक मला काहीही म्हणोत, माझ्या वाढलेल्या वजनावर जोक्स करोत, मला ट्रोल करोत... आता कशाचाही माझ्यावर परिणाम होत नाही, असे ती म्हणाली.
7 / 9
मला कुठलेही फिल्मी बॅकग्राऊंड नव्हते. मीच माझे गुरु होते. मी पूर्वापार नेहमीच लठ्ठ मुलगी होते.मला सुरुवातीपासूनच हार्मोन्ससंबंधीच्या अडचणी आहेत. मला याचा राग यायचा. पण आताश: मी सगळं मान्य केले आहे, असेही तिने सांगितले.
8 / 9
फिल्म इंडस्ट्रीत सतत सुंदर दिसण्याच्या नादात मी अनेकदा निराश व्हायचे. मी नैराश्यात जात होते. मात्र, कालांतराने मी ही गोष्ट मान्य केली पण यासाठी मला बराच वेळ लागला, असेही तिने सांगितले.
9 / 9
मला देवाने जो देह दिलाय, जे शरीर दिले आहे, तेच माझ्या जिवंतपणाची निशाणी आहे. ज्या दिवशी हे शरीर काम करणे बंद करेल, त्यादिवशी मी कुठेच नसेल, हे मला कळले. आता मी माझ्या शरीरावर प्रेम करते. कारण हे शरीर माझे आहे. हे शरीर हेच माझे अस्तित्व आहे, असेही विद्या म्हणाली.
टॅग्स :विद्या बालन