जॉली एलएलबी2
‘जॉली एलएलबी’चा सीक्वल ‘जॉली एलएलबी2’ येत्या टेडी बीअर डेच्या दिवशी प्रदर्शित होतोय. या कोर्ट रूम ड्रामात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. अक्षय यात हुमा कुरेशीसोबत रोमान्स करताना दिसणार असला तरी मुळात हा कोर्ट रूम ड्रामा आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे रोमॅन्टिक मूडमध्ये असलेल्या तरूणाईचे काहीसे मूड आॅफ होणे अगदी ठरलेले आहे.
दी गाझी अटॅक
व्हॅलेन्टाईन डेची झिंग पूर्णपणे उतरायची बाकी असतानाच, ‘दी गाझी अटॅक’ हा चित्रपट रिलीज होतोय. व्हॅलेन्टाईन डेनंतर तीन दिवसांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तापसी पन्नू आणि राणा डग्गूबती यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट म्हणजे एक सागरी युद्धकथा आहे. अंशत: हा चित्रपट संकल्प रेड्डी यांच्या ‘ब्ल्यू फिश’ या पुस्तकावर आधारित आहे. भारतीय पाणबुडी एस21 वर तैनात जवानांचा १८ दिवसांचा पाण्यातील संघर्ष यात दिसणार आहे.तामिळ व तेलगूसह हिंदीत हा चित्रपट रिलीज होणार आहे. याच्या हिंदी व्हर्जनमध्ये महानायक अमिताभ यांचा आवाज आहे.
इरादा
‘इरादा’ हा चित्रपटही ‘दी गाझी अटॅक’सोबत सिनेमागृहांत झळकणार आहे. नसीरूद्दीन शहा आणि अर्शद वारसी यांची दमदार जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात अर्शद पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत आहे. दिव्या दत्ता, शरद केळकर, सागरिका घाटगे यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
व्हाय नॉट ‘व्हॅलेन्टाईन वीक’ ?
यापूर्वी फेबु्रवारी महिन्यात बॉक्सआॅफिसवर केवळ प्रेम आणि प्रेम पाहायला मिळालचे. पण आताश: हा ट्रेंड पूर्णपणे मोडीत निघाला आहे. ईद, दिवाळी आणि नाताळप्रमाणेच ‘व्हॅलेन्टाईन वीक’ सुद्धा कमर्शिअल झालाय. यामागचे कारण शोधायचे झाल्यास गेल्या काही वर्षांतल्या या महिन्यात प्रदर्शित रोमॅन्टिक चित्रपटांवर एक नजर टाकावी लागेल. गतवर्षी ‘व्हॅलेन्टाईन वीक’दरम्यान सहा चित्रपट रिलीज झाले होते. यात ‘सनम रे’आणि ‘फितूर’ या दोन रोमॅन्टिक चित्रपटांचा समावेश होता. पण‘व्हॅलेन्टाईन वीक’ असूनही या दोन रोमॅन्टिक चित्रपटांकडे पे्रक्षकांनी पाठ फिरवली. याऊलट याच महिन्यात रिलीज झालेल्या ‘नीरजा’ व ‘अलीगढ’ या रिअल स्पेस चित्रपटांना लोकांनी पसंती दिली.