Join us  

उर्वशी रौतेला आता घेतेय लखनवी भाषेचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या…

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 8:51 PM

1 / 10
गेल्या काही दिवसांपासून तिच्या कामापेक्षा कमी मात्र महागड्या फॅशन स्टेटमेंटमुळे जास्त चर्तेत होती. आता ती पुन्हा तिच्या कामाकडे वळली आहे.
2 / 10
सध्या नवनवीन गोष्टी शिकण्यात ती व्यस्त आहे. उर्वशी तिच्या कामात व्यस्त असूनही ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना तिच्या रुटीनविषयी अपडेट करत रहात असते.
3 / 10
तिचे मागो माग येणारे आगामी चित्रपटांसाठी चर्चेत आहे आणि असे वाटते ह्या वर्षी उर्वशी रौतेला म्युझिक विडिओ पासून ते वेब सिरीज पॅरेंत सगळ्याच गोष्टी करणार आहे.
4 / 10
उर्वशी रौतेला वेब सिरीज 'इन्स्पेक्टर अविनाश' मध्ये पूनम मिश्रा म्हणजेच अविनाश मिश्राच्या बायकोची भूमिका साकारत आहे, ह्यात पूनम मिश्राच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत आहे
5 / 10
भूमिकेसाठी तिच्या वागण्या बोलण्यापासून ते चेह-यावरील हावभाव यावरही ती मेहनत घेत आहे.
6 / 10
पूर्णपणे त्या भूमिकेत तिने स्वतःला झोकून दिले आहे. या भूमिकेसाठी उर्वशी रौतेला लखनवी भाषेचेही धडे घेत असून या भाषेतील संवादफेकीवर ती बरीच मेहनत घेत आहे.
7 / 10
इतकंच नाही तर तिला काही काही पुस्तकं सुद्धा वाचण्यासाठी देण्यात आली आहेत. वेब सिरीजचे डायरेक्टर नीरज यांच्या मदतीने उर्वशी रौतेला रोज लखनवी अंदाज मध्ये सेट बोलण्याचा सराव करते.
8 / 10
सेटवरील उर्वशीचे काही फोटो देखील समोर आले आहेत.उर्वशी रौतेलासोबत “इंस्पेक्टर अविनाश” वेबसिरिजीमध्ये अभिनेता रणदीप हूडादेखील झळकणार आहे.
9 / 10
आगामी काळातही उर्वशी आणखी बड्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. त्यामुळे या वर्षी विविध अंदाजात पाहणे तिच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असणार आहे.
10 / 10
थ्रिलर वेबसिरिज पोलिस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या जीवनातील वास्तविक घटनांवर आधारित आहे. 'सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. आगामी काळात उर्वशी विविध भूमिका साकारत रसिकांच्या भेटीला येणार आहे.
टॅग्स :उर्वशी रौतेलारणदीप हुडा