* थाटमाट : हिंदु संस्कार आणि विधींनुसार होणाऱ्या लग्नांचा थाटच काही और असतो. गोव्यात युवराज सिंग आणि हेजल कीच यांनीही महाराष्ट्रीयन पद्धतीने अग्नीच्या साक्षीने सात जन्म एकमेकांसोबत संसार करण्याची वचनं दिली.
* बाईकवरून एन्ट्री : ‘कुर्ता-पायजमा’, ‘हाफ जॅकेट’ आणि गोल्डन-ब्राऊन रंगाचे सनग्लासेस घातलेला युवराज या लग्नाकार्यावेळी सर्वांच्या उत्सुकतेचा भाग बनला. यावेळी मस्तपैकी बँड बोलावण्यात आला. युवीने खास त्याच्या स्टाईलमध्ये बाईकवरून एन्ट्री केली.
* डॅशिंग ‘वर’ : लग्न म्हटल्यावर वर हा हॅण्डसम, गुड लुकिंग दिसलाच पाहिजे. अगदी तसाच युवीही त्याच्या कुर्ता -पायजमा ड्रेसिंगमध्ये अतिशय डॅशिंग दिसत होता.
* यारों के साथ : भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांच्यासोबत युवीने फोटोसेशन केले. रोहितला झालेल्या दुखापतीमुळे तो टीमपासून थोडा दूरच होता. मात्र, त्याला गोव्यात मित्राच्या लग्नासाठी येण्याचा मोह काही आवरता आला नाही.
* सूर्याच्या साथीने : सूर्य मावळतीला जात असतांना युवराजने हेजलच्या कुटुंबियांसमवेत काही विधी पूर्ण केले. गोव्यातील ही लग्नाची स्थळे युवराज-हेजलने ठरवलेली आहेत.
* मित्र-आप्तेष्टांसह : युवराज सिंगचा मॅनेजर अनीश गौतम सोबत रोहित शर्मा आणि रितीका सजदेह.
* अनुष्का-विराटची हजेरी : रोहित शर्मा, रितीका सजदेह, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी लग्नाला हजेरी लावली. विराट आणि अनुष्का यांनी दिल्लीहून प्रस्थान करून गोव्यात मित्र युवराजच्या लग्नासाठी उपस्थिती नोंदवली.