डब्बूने एक कंन्सेप्ट मला सांगितली त्यानुसाच ते फोटोशूट मी केले आहे. डब्बूच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट करण्याची माझी पहिलीच वेळ होती. या फोटोत असे काही बोल्डनेस नाहीय जेवढे बघणा-यांना वाटतोय. अवघ्या एका तासात माझे हे शूट करण्यात आले. जास्त मेकअपचा भडिमार न करता जितका नॅचरल दिसेल तितकाच मेकअप आणि तशाच ड्रेसिंगची निवड करण्यात आली. मी या फोटो शूटसाठी काहीच पूर्वतयारी केलेली नव्हती. मी ट्रॅव्हल करत असताना मला फक्त डब्बूचा एक कॉल आला त्यानुसार जेव्हा मी माझे काम संपवून परत आले तेव्हा लगेचच शूटला सुरूवात करण्यात आली. इतक्या कमी वेळात डब्बूने खूप चांगले मला या कॅलेंडरवर प्रेझेंट केले आहे.
दिशाचा चेहरा हा खूप फोटोजेनिक असल्यामुळे तिचा लूक खूप छान दिसतोय. दरवर्षी मी एक नवोदित चेह-याची कॅलेंडरसाठी निवड करतो. त्याचप्रमाणे यावर्षी मी दिशाची निवड केली. याआधीही मी एक ब्रँड कॅलेंडरसाठी दिशासह फोटोशूट केले आहे. तिच्यात मला हवा असणारे पोटेंशिअल आणि स्पार्क दिसला. त्यामुळे तिच्याबरोबर काम करण्यात वेगळाच उत्साह वाटतो. यापुढेही मला तिच्याबरोबर काम करायला आवडेल असे डब्बू रत्नानीने म्हटले आहे.
तसेच फक्त दिशानेच या कॅलेंडरसाठी हॉटफोटोशूट केले आहे असे नाहीय. याआधीही विद्या बालन,आलिया भट्ट,सोनाक्षी सिन्हा यासारख्या अनेक अभिनेत्रींनी त्यांची या फोटोशूटसाठी क्रिएटीव्हीटी दाखवली आहे. याशिवाय अभिनेत्यांमध्ये टायगर श्रॉफचे या कॅलेंडरसाठी फोटोशूट करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचाही अनोखा अंदाज पहायला मिळेल असेही डब्बूने म्हटले आहे.