आता ही वेगळी आहे की, दोघे मीडियासमोर एकमेकांना केवळ चांगले मित्र असल्याचे सांगतात आणि भासवतात. पण दोघे अनेकदा एकमेकांसोबत दिसतात, एकदम कपल असल्यासारखे.
आता खरे काय आणि खोटे काय हे तर केवळ त्यांनाचा माहित. पण तुम्हाला माहित आहे का, दिशा चित्रपटांत येण्यापूर्वी मॉडेल होती? २०१३ साली ती ‘मिस इंडिया’ची रनर अप होती. तेव्हापासून ती प्रकाशझोतात आली.
त्यानंतर तिचे नाव टायगरशी जोडले गेले आणि सर्वांच्या तोंडी तिचे नाव झाले. एकमेकांसोबत हॉटेल्समध्ये डिनर करताना त्यांना अनेकवेळा पाहिले गेले. त्यामुळे दोघांच्या अफेयरची जोरदार चर्चा सुरू झाली.
जेव्हा जेव्हा त्यांना याविषयी विचारण्यात आले तेव्हा तेव्हा त्यांनी ‘आम्ही केवळ चांगले मित्र आहोत’चा नारा लावून धरला. दोघांनी ‘बेफिक्रा’ नावाच्या गाण्याच्या व्हिडिओमध्ये एकत्र काम केलेले आहे. एवढेच नाही तर दिशा आगामी ‘कुंग फू योगा’ या चीनी चित्रपटात जागतिक सुपरस्टार जॅकी चॅनसोबत झळकणार आहे.
दिशाचा जन्म बरेली येथील एका कुटुंबात झाला. वयाच्या १७ व्या वर्षी तिने मॉडलिंगसाठी पहिला फोटोशूट केला होता. त्यावेळी तिने केलेले फोटोसेशन अत्यंत सोज्वळ होते. ते फोटो पाहून तुम्हाला दिसेलच की, किती सौजन्यपूर्ण आणि शालीन फोटोशूट होता तो. दिशा यामध्ये अत्यंत सुंदर दिसते.