करिना कपूर (कल हो ना हो)
‘कल हो ना हो’ या चित्रपटातील नैनाची भूमिका सर्वप्रथम करिना कपूरला आॅफर झाली होती. पण ही भूमिका करिनाने नाकारली. पुढे ही भूमिका प्रीति झिंटाच्या वाट्याला आली आणि ‘नैना’ हिट ठरली. अर्थात हा चित्रपट सुपरडुपर हिट राहिला.
कंगना राणौत (डर्टी पिक्चर)
‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटाने विद्या बालनला भूतो ना भविष्यति असे यश मिळवून दिले. पण ही भूमिका सर्वप्रथम कंगना राणौतला आॅफर झाली होती. पण कंगनाने का कोण जाणे, ही भूमिका नाकारली आणि कदाचित ही तिच्या करिअरमधील सगळ्यात महाग चूक ठरली.
अजय देवगण (करण अर्जुन)
करण अर्जुनमध्ये शाहरूख खानची भूमिका अजय देवगणला आॅफर केली गेली होती. पण अजयने यास नकार दिला अन् सगळा भाव एसआरके खावून गेला.
ऐश्वर्या राय (राजा हिंदुस्तानी)
आमिर खान व करिश्मा कपूर स्टारर ‘राजा हिंदुस्तानी’ हा सिनेमा प्रचंड हिट झाला होता. या चित्रपटात करिश्माने साकारलेली भूमिका सर्वप्रथम ऐश्वर्याला आॅफर केली गेली होती.
शाहरूख खान (लगान)
आमिर खानशिवाय ‘लगान’ची आज तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण खरे तर यातील लीड रोलसाठी सर्वप्रथम शाहरूखचे नाव समोर आले होते. शाहरूखने हा चित्रपट नाकारला म्हणून यात आमिर दिसला.
हृतिक रोशन (दिल चाहता है)
‘दिल चाहता है’ या तरूणाईला प्रचंड भावलेल्या चित्रपटातील आकाशची भूमिका सर्वप्रथम हृतिकला आॅफर केली गेली होती. पण हृतिकने यास नकार दिला आणि आमिर खान आकाश बनला.
सलमान खान (बाजीगर)
होय, सलमान खान ‘बाजीगर’ बनता बनता राहिला. ही भूमिका सलमानने नाकारली आणि मग शाहरूखने हा चित्रपट करून लोकप्रीयतेचा एक इतिहास रचला.
अक्षय कुमार (भाग मिल्खा भाग)
‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमासाठी खिलाडी अक्षय कुमार मेकर्सची पहिली चॉईस होता. पण अक्षयने या भूमिकेसाठी नकार दिला आणि या चित्रपटात फरहान अख्तरची वर्णी लागली.
कॅटरिना कैफ (ऐ जवानी है दिवानी)
‘ऐ जवानी है दिवानी’ या सुपरहिट सिनेमात खरे तर कॅटरिना कैफ दिसली असती. पण कॅटने नकार दिला. त्या नकाराचे परिणाम नंतर तिने बघितलेच.
सलमान खान (चक दे इंडिया)
‘चक दे इंडिया’ हा शाहरूख खानचा ‘वन आॅफ द बेस्ट’ चित्रपट. पण ही भूमिका सलमानला आॅफर झाली होती. पण सलमानने यास नकार दिला.
डैनी डेन्जोंगपा (शोले)
भारतीय सिनेमात इतिहास रचणा-या ‘शोले’मधील गब्बर सिंगची यादगार भूमिका सर्वप्रथम डॅनीला आॅफर केली गेली होती. पण डॅनीने नकार दिला अन् तो इतिहासाच्या पानावरील सुवर्णाक्षर बनता बनता राहिला.