बेगम जान
‘डर्टी पिक्चर’, ‘कहानी’, ‘कहानी2’ या चित्रपटात केवळ आणि केवळ विद्या बालन हिच पडद्यावर दिसली. या तिन्ही चित्रपटात विद्याच ्न‘हिरो’ होती. विद्याच ्न‘हिरो’ असलेला आणखी एक चित्रपट मार्चमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. होय, ‘बेगम जान’ हा पूर्णत: नायिकाप्रधान सिनेमा फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारलेला आहे. हा या वर्षांतला सर्वात पहिला नायिकाप्रधान चित्रपट असणार आहे.
फिल्लोरी
अनुष्का शर्मा व दिलजीत दोसांज यांची मुख्य भूमिका असलेला ‘फिल्लोरी’ हा सिनेमाही येत्या मार्चमध्येच प्रदर्शित होतो आहे. अनुष्का शर्मा हिची निर्मिती असलेला हा चित्रपट रोमॅन्टिक कॉमेडी प्रकारात मोडणारा असला तरी नायिकाप्रधान चित्रपट आहे.
नाम शबाना
‘पिंक’फेम अभिनेत्री तापसी पन्नू हिचा ‘नाम शबाना’ हा सिनेमा येत्या मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीय येतो आहे. २०१५ मध्ये आलेल्या ‘बेबी’ या सिनेमाचा हा सीक्वल आहे. हा चित्रपटही नायिकाप्रधान चित्रपटांच्या रांगेत मोडणारा चित्रपट आहे.चित्रपटाचे फर्स्ट लूक दाखवणारे पोस्टर पाहिल्यानंतर तुम्हीही हे मानाल.
नूर
सोनाक्षी सिन्हा हिने ‘अकिरा’ अगदी एकटीच्या बळावर पेलला असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाहीत. या चित्रपटातील सोनाचा अॅक्शन अवतार पाहून सगळेच थक्क झाले. ‘अकिरा’ नंतर सोनाक्षी लवकरच ‘नूर’ या नायिकाप्रधान चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट पाकिस्तानी लेखक सबा इम्तियाज यांच्या ‘कराची’ या नॉवेलवर आधारित आहे. यात सोना पाकिस्तानी पत्रकार व लेखिका नूर हिची व्यक्तिरेखा साकारणार आहे. येत्या एप्रिलमध्ये सोना आणि केवळ सोनाभोवती फिरणारा ‘नूर’ पाहायला तुम्हीही उत्सूक असालच!
हसीना
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर बेतलेला ‘हसीना’ हा नायिका प्रधान चित्रपटही या नव्या वर्षांत आपल्या भेटीस येणार आहे. श्रद्धा कपूर यात हसीना पारकर हिची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे श्रद्धा हीच या चित्रपटाची खरी ‘हिरो’ असणार आहे.
सिमरन
बॉलिवूड ‘क्वीन’ कंगना राणौत पुन्हा एकदा ‘सिमरन’ या चित्रपटात शीर्षक भूमिकेत दिसणार आहे. सिमरन साकारणारी कंगना हिच या चित्रपटात भाव खाऊन जाणार, हे वेगळे सांगणे नकोच. येत्या सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
पद्मावती
‘पद्मावती’ हा यंदाचा सगळ्यांत बहुप्रतिक्षीत चित्रपट. भन्साळी यांचा हा सिनेमा खिलजी वंशाच्या अलाउद्दीन खिलजी यांच्यावर आणि मेवाडची राणी पद्मावती यांच्यातल्या प्रेमावर आधारलेला आहे. राणी पद्मावतीही तिची सुंदरता, बुद्धी आणि साहसासाठी ओळखली जायची. दीपिका पादुकोण या राणी पद्मावतीची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे तिच या चित्रपटाची खरी ‘हिरो’ असणार आहे.