वयाच्या ४२व्या वर्षी सुष्मिता सेन दिसली नववधूच्या वेशात; पाहा तिच्या अदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 18:45 IST
माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन जेव्हा नववधूच्या वेशात बघावयास मिळाली तेव्हा सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. वयाच्या ४२व्या वर्षीय सुष्मिताचा ...
वयाच्या ४२व्या वर्षी सुष्मिता सेन दिसली नववधूच्या वेशात; पाहा तिच्या अदा!
माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन जेव्हा नववधूच्या वेशात बघावयास मिळाली तेव्हा सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. वयाच्या ४२व्या वर्षीय सुष्मिताचा अंदाज खूपच रॉयल दिसला. तिचा जलवा बघण्यासारखा होता. त्यामुळे तिच्यावर नजर हटविणे अनेकांना अवघड झाले होते. सुष्मिताने डिझायनर मीरा आणि मुजफ्फर अली यांनी बनविलेला लहेंगा आणि चोळी परिधान केली होती. ती जेव्हा रॅम्पवर उतरली तेव्हा ‘उमराव जान’मधील ‘इन आंखों की मस्ती’ हे गाणे लावण्यात आले होते. सुष्मितानेही अभिनेत्री रेखा यांच्या अदांची कॉपी करत वॉक केला. सुष्मिताने ग्लिटरी चोळीवर लहेंगा परिधान केला होता. या पोशाखावर तिने एक हेवी दुपट्टाही कॅरी केला होता. त्याचबरोबर हेवी ज्वेलरीमध्ये ती एखाद्या नववधूप्रमाणे दिसत होती. ड्रेसला मॅचिंग असा कपाळावर टीका लावल्याने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली होती. वयाच्या ४२व्या वर्षी सुष्मिताचा हा नववधू अंदाज अनेकांना भावला नसेल तरच नवल. कारण जेव्हा सुष्मिता रॅम्पवर उतरली तेव्हा अनेकांनी तिची छबी टिपण्याचा प्रयत्न केला. सुष्मिता सध्या पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याची तयारी करीत आहे. ती गेल्या अडीच वर्षांपासून योग्य पटकथेचा शोध घेत आहे. अखेरीस ती ‘निर्भिक’ या बंगाली चित्रपटात बघावयास मिळाली होती. आता तिला पुन्हा एकदा कमबॅक करायचे आहे. यावेळी सुष्मिताने मीडियाशी बोलताना म्हटले की, ‘मला खूप काही करायचे आहे. मी असा चित्रपट करू इच्छिते ज्यामुळे मला सन्मान मिळेल. मी माझ्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू इच्छिते. सुष्मिता ‘लॅक्मे फॅशन वीक समर/रिसोर्ट २०१८’मध्ये सहभागी झाली होती.