Join us  

सनी लिओनीच्या कलेक्शनमध्ये नव्या लक्झरी कारची भर, किंमत वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 4:32 PM

1 / 12
अभिनेत्री सनी लिओनीचं Maserati Cars वर फारच प्रेम दिसतंय. कारण सनीने आणखी एक लक्झरी Maserati कार खरेदी केली आहे. सनी सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलिसमध्ये राहत आहे. आणि तिथेच तिने एक पांढऱ्या रंगाची आलिशान Maserati Ghibli कार खरेदी केली आहे.
2 / 12
सनीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, 'आम्ही काल ही बीस्ट घरी घेऊन आलो होतो. मी जेव्हाही कार चालवते मला आनंद होतो'. त्यासोबतच सनीने Maserati च्या ऑफिशिअल अकाउंटला मेंशन केलंय. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर नवी गाडी खरेदी केल्याचं आनंद स्पष्टपणे दिसतोय.
3 / 12
Maserati Ghibli बाबत सांगायचं तर ही एक इटालियन स्पोर्ट कार आहे. पोजिशनबाबत ही कार Maserati Quattroporte च्या खाली येते.Quattroporte तुलनेत Ghibli छोटी आहे आणि याचं डिझाइन कपलसाठी सुटेबल आहे या कारमध्ये V6 इंजिन आहे. तर Quattroporte मध्ये V8 मोटर आहे.
4 / 12
Maserati Ghibli कारची अमेरिकेतील किंमत साधारण ८० हजार यूएस डॉलर म्हणजे जवळपास ५९ लाख रूपये इतकी आहे. भारतात या कारची किंमतत 1.31 कोटी रूपयांपासून सुरू होते. ही कार इम्पोर्ट करण्याला जास्त खर्च येतो.
5 / 12
ही सनीने घेतलेली तिसरी कार आहे. याआधीही सनीने दोन Maserati कार खरेदी केल्या आहेत. यात एक Maserati Ghibli आहे. ही एक लिमिटेड कार एडीशन आहे. जी २०१७ मध्ये सनीने घेतली होती.
6 / 12
सनीची लिमिटेड एडीशन Ghibli कार लॉस एंजलिसच्या घरी आहे. तर Quattroporte ही कार मुंबईतील घरी आहे. तिने या कार्स वेगवेगळ्या रंगात खरेदी केल्या आहेत.
7 / 12
सनी लिओनी सध्या लॉस एंजलिसमध्ये फॅमिलीसोबत एन्जॉय करत आहे. आपल्या मुलांना जास्तीत जास्त वेळ ती सध्या देत आहे.
8 / 12
9 / 12
10 / 12
11 / 12
12 / 12
टॅग्स :सनी लिओनीबॉलिवूडकार