Join us  

जॅकलिनसाठी सुकेशचं तुरूंगातून नवं पत्र, म्हणाला- "तू सुपर हॉट आहेस, नवरात्रीच्या ९ दिवसांत..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 1:03 AM

1 / 9
Jacqueline Fernandez Sukesh Chandrashekhar: जॅकलिन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील एक बोल्ड अभिनेत्री आहे. ती अभिनेत्री आणि मॉडेल असली तरी गेल्या काही काळापासून नकारात्मक गोष्टींमुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे.
2 / 9
२०० कोटी खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता असा दावा केला जातो.
3 / 9
सुकेश तुरूंगात आहे. पण अजूनही जॅकलिनवर त्याचं तितकंच प्रेम आहे. तो तुरुंगातूनही तिला सातत्याने पत्र लिहितो.
4 / 9
सुकेश सध्या दिल्लीच्या मंडोली तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पण तो बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती.
5 / 9
जॅकलीनने सुकेशसोबत कोणत्याही प्रकारचे प्रेमसंबंध नाकारले असले तरी तो आरोपी असलेल्या प्रकरणात ED ने अनेकदा जॅकलिनची चौकशी केली आहे.
6 / 9
तशातच रविवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या आधी जॅकलीनसाठी सुकेशने थेट तुरूंगातून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने जॅकलिनसाठी एक खास गोष्ट करणार असल्याचं म्हटलं आहे.
7 / 9
सुकेशने पत्रात लिहिले आहे, “बेबी, पहिली गोष्ट म्हणजे तू दोहा शोमध्ये खूप हॉट आणि सुंदर दिसत होतीस. तुझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही.'
8 / 9
'बेबी, या नवरात्रीत मी तुझ्यासाठी नऊ दिवस उपवास करणार आहे. असं केल्याने तुझं आरोग्य चांगलं राहिल आणि आसपासची नकारात्मकता दूर होईल,' असे पत्रात लिहिले आहे.
9 / 9
तसेच, नवरात्रीच्या नवव्या दिवशी वैष्णोदेवी मंदिर आणि महाकालेश्वर मंदिरात जॅकलीनसाठी विशेष पूजेची व्यवस्था करण्याचा सुकेशचा मानस असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसधोकेबाजीतुरुंगनवरात्रीव्हायरल फोटोज्