Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील रिसेप्शन सोहळ्यात अशा अंदाजात दिसले विरूष्का; क्रिकेट बॉलिवूड जगतातील मान्यवरांची हजेरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 22:41 IST

दिल्लीनंतर मुंबई येथे आयोजित केलेल्या विराट कोहली, अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात बॉलिवूडसह, क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी ...

दिल्लीनंतर मुंबई येथे आयोजित केलेल्या विराट कोहली, अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात बॉलिवूडसह, क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. रात्री ८.३० वाजेपासून मान्यवरांच्या आगमनास सुरूवात झाली. तसेच सोहळ्याच्या ठिकाणी विरूष्कानेही हजेरी लावली असून, या नवदाम्पत्यांवर उपस्थितांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, रिसेप्शनस्थळी पोहोचलेल्या नव दाम्पत्याचा अंदाज बघण्यासारखा होता. दोघांनी स्टेजवर हजेरी लावताच जणू काही सोहळ्यात रंगत निर्माण झाली. या सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी सुरुवातीलाच हजेरी लावली. त्याचबरोबर बीसीआयचे काही सदस्यही सोहळ्यासाठी आपल्या परिवारासह उपस्थित असल्याचे दिसून आले. तसेच बॉलिवूडमधीलही बरेचसे सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. विरूष्काने ११ डिसेंबर रोजी इटली येथे लग्न केल्यानंतर त्यांनी दिल्लीत अतिशय ग्रॅण्ड पद्धतीने रिसेप्शन दिले होते. आता पुन्हा एकदा काहीशा तशाच अंदाजात रिसेप्शन सोहळा रंगला आहे.