सुहाना सध्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतेय. डान्सिंग आणि स्पोर्ट तिचे आवडीचे विषय. सुहानाने एक डान्सर म्हणून नाव कमवावे, असे शाहरूखला वाटतेय. अर्थात सुहानाने अभिनय क्षेत्रात यावे, यालाही शाहरूखची ना नाहीय. तसेही सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत. अलीकडे शाहरूखची लाडकी लेक सुहाना एक उत्तम अभिनेत्री बनणार, मोठे नाव कमावणार, असे भाकीत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी वर्तवले होते.
‘माझे शब्द लक्षात ठेव. सुहाना खान ही पुढे जाऊन एक चांगली अभिनेत्री होणार. मी तिचे काही व्हिडिओ बघितले आहेत. तिने खूप छान अभिनय केलाय,’ असे टिष्ट्वट शबाना यांनी शाहरूखला उद्देशून केले आहे. शबाना यांचे हे शब्द ऐकून शाहरूखचा ऊर भरून आला होता. तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात. तुमच्या या विश्वासानंतर नक्कीच छोटीला प्रेरणा मिळेल, अशा शब्दांत त्याने शबानांचे आभार मानले होते.