मी माझ्या आई-वडिलांसोबत राहू इच्छितो. त्यांना सोडून मी कुठल्याही बंगल्यात शिफ्ट होणार नाही. एखाद्या मोठ्या अलिशान बंगल्यापेक्षा हे अपार्टमेंट मला प्राणापलिकडे प्रिय आहे. कारण याठिकाणी माझे आई-बाब राहतात. मी लहानपणापासून याठिकाणी राहिलो आहे. या अपार्टमेंटमधील सगळी माणसं माझ्या कुटुंबासारखे आहेत. आम्ही लहान होतो तेव्हा खालच्या गार्डनमध्ये तासन् तास खेळायचो. अनेकदा तर गार्डनमध्येच झोपी जायचो. आमच्यासाठी अपार्टमेंटमधील सगळी घरे आमचीच घरे होती. कुठल्याही, कुणाच्याही घरात जायचो. जेवायचो, खेळायचो. गॅलेक्सी अपार्टमेंटशी माझ्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. हे घर सोडून मला कुठेच जायचे नाही. मी कायम इथेच राहू इच्छितो, असे सलमान म्हणाला.
सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतो आहे. यात सलमानचा भाऊ सोहेल खान आणि चीनी अभिनेत्री झू झू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.