Join us

​‘सर, थोड़ी कम लगाया करोे...’! पीओकेवरील ट्विटनंतर चाहत्यांचा ऋषी कपूर यांना सल्ला!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 15:41 IST

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना पुन्हा एकदा लोकांनी खरी-खोटी सुनावली आहे.   कारण आहे ऋषी कपूर यांनी पाकव्याप्त काश्मिर अर्थात ...

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना पुन्हा एकदा लोकांनी खरी-खोटी सुनावली आहे.   कारण आहे ऋषी कपूर यांनी पाकव्याप्त काश्मिर अर्थात पीओकेसंदर्भात केलेले  ट्विट .ऋषी कपूर यांनी पीओकेसंदर्भात जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केलेल्या वक्तव्याची पाठराखण केली आहे. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा पाकिस्तानचा भाग असून पीओकेला पाकपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे वादग्रस्त विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले होते. ऋषी कपूर यांनी अब्दुल्लांच्या या मताचे समर्थन करत, एक ट्विट केले आहे. ‘फारुख अब्दुल्लाजी, सलाम! मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. जम्मू- काश्मीर आपला आहे आणि पीओके त्यांचा. या एकमेव मार्गानेच आपण ही समस्या सोडवू शकतो. मी ६५ वर्षांचा आहे आणि मृत्यूपूर्वी मला एकदा पाकिस्तान पाहायचे आहे. माझ्या मुलांनी त्यांच्या पूर्वजांची पाळेमुळे पाहावीत, अशी माझी मनातून इच्छा आहे. आता करूनच टाका’, असे  ट्विट  ऋषी केले आहे. (ऋषी कपूर यांचे पूर्वज फाळणीपूर्वी पाकिस्तानात राहत होते, हे तुम्हाला ठाऊक असेलच.)ऋषी कपूर यांचे हे टिष्ट्वट वाचून पाकिस्तानींना अर्थातच आनंद झाला. पण भारतात म्हणाल तर, अनेक चाहत्यांनी यावरून ऋषी कपूर यांना फैलावर घेतले. ऋषी कपूर नशेत  ट्विट  करतात, असे सांगत अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. खुद्द नीतू कपूर पती ऋषी कपूर यांच्या मद्याच्या व्यसनाबदद्ल बोलल्या आहेत. यावरून चाहत्यांनी ऋषी यांना लक्ष्य केले. ‘६५ वर्षांच्या वयात कोरी प्यायची नसते. सोडा संपला असेल तर पाणी टाकून घेत जा,’ असे एकाने त्यांना सुनावले. एका युजरने तर चांगलीच खेचली.‘गुरु देशी लाल घोड़ा पीये हो तुम आज? लेकिन समझ आ गया ६०- ६५ साल की उम्र में रिटायर क्यो कर देती है सरकार ’, असे त्याने लिहिले. ALSO READ :​रणबीर कपूरच्या ‘फ्लॉप’ सिनेमांमुळे संतापले ऋषी कपूर ! ‘या’ दोन दिग्दर्शकांची केली माकडांशी तुलना!!तुम्हाला ठाऊक असेल की, ऋषी कपूर पृथ्वीराज कपूर यांचे नातू आहेत. पृथ्वीराज यांचा जन्म समुंदरी, लायलपूर-पंजाबात (सध्या पाकिस्तानात) झाला होता.