नुकतीच श्रद्धा फरहानच्या घराला चकरा मारताना दिसली... त्यांच्यात नक्कीच काहीतरी शिजतेय, असे जर तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा..तुमचा गैरसमज होतोय. कारण, ‘रॉक आॅन ३’ चित्रपटाविषयी प्लॅनिंग सुरू झाले आहे. पुन्हा एकदा ‘रॉक आॅन २’ ची टीम एकत्र येणार आहे, ही एक खुशखबर आहे. कलाकारांच्या तारखा, स्क्रिप्ट याविषयी बोलणी सुरू झाली आहेत.
‘रॉक आॅन २’ टीममधील कलाकार अर्जुन रामपाल, पत्नी मेहेर जेसिआ यांच्यासह श्रद्धा कपूर हे वांद्रे येथील फरहानच्या घराबाहेर आलेले माध्यमांना दिसले. अर्जुन-मेहेर हे कॅज्युअल ड्रेसिंगमध्ये दिसले. तसेच श्रद्धा ही लाल रंगाच्या कुर्तीमध्ये आली होती. माध्यमांच्या प्रश्नांना टाळण्यासाठी तिने फोनवर चॅटिंगला सुरूवात केली. सध्या ती आदित्य रॉय कपूरसोबत ‘ओके जानू’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसेच ‘रईस’चा निर्माता फरहान अख्तर असल्याने तो देखील प्रमोशनमध्ये बिझी आहे. एकंदर काय, ‘रॉक आॅन २’ टीम पुन्हा एकत्र दिसणार तर...!