Join us

shocking !! अभिजीत भट्टाचार्यला पाठींबा देत सोनू निगमने सोडले ट्विटर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 12:21 IST

गायक अभिजीत भट्टाचार्यच्या ट्विटर अकाऊंट ब्लॉक प्रकरणाची माहिती तुम्हाला असेलच. अभिजीतच्या वादग्रस्त ट्विटनंतर त्याचे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे. ...

गायक अभिजीत भट्टाचार्यच्या ट्विटर अकाऊंट ब्लॉक प्रकरणाची माहिती तुम्हाला असेलच. अभिजीतच्या वादग्रस्त ट्विटनंतर त्याचे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे. अभिजीतने अनेक वादग्रस्त विधाने केलीत. अनेकदांना वादग्रस्त पद्धतीने लक्ष्य केले. यानंतर त्याचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आले. ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाल्यावर अभिजीतने अलीकडे एका मुलाखतीत याविरोधात आरोप केलेत. माझे ट्विटर अकाऊंट ब्लॉक होण्यामागे अरूंधती राय आणि जेएनयू समर्थकांचा हात आहे. अर्थात यामुळे मला काहीही फरक पडत नाही. कारण संपूर्ण देश माझ्यासोबत आहे, असे अभिजीत या मुलाखतीत म्हणाला.तुम्ही अभिजीतच्या युजर आयडीवर गेल्यास त्यावर अकाऊंट सस्पेंडेड असे दाखवले जात आहे. अर्थात ट्विटरने अभिजीतचे अकाऊंट नेहमीसाठी ब्लॉक केले की अस्थायी रूपात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि अभिजीतचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाल्यावर अनेकजण अभिजीतच्या बाजूने उभे राहिलेत. यात गायक सोनू निगम याचाही समावेश आहे. सोनूने अभिजीतच्या बाजूने आवाज उठवत त्याला खंबीर पाठींबा दिला आहे. ‘खरचं अभिजीतचे ट्विटरअकाऊंट ब्लॉक करण्यात आलेय. असे असेल तर ९० टक्के अकाऊंट ब्लॉक करायला हवेत’, असे ट्विट सोनूूने केले आहे.  यानंतर सोनूने एकापाठोपाठ एक २४ ट्विट केलेत आणि आपण ट्विटर सोडत असल्याचे जाहिर केले. या ट्विटमध्ये सोनूने अभिजीत आणि परेश रावल यांचे नावही घेतले. अभिजीत दांच्या विचारांशी अनेकजण असहमत असू शकतील. पण शहलाने भाजपावर लावलेला सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप योग्य होता? त्यांचे अकाऊंट डिलीट व्हायला नको होते का? एक महिला गौतम गंभीरचा फोटो आर्मी जीपच्या समोर लावू शकते. पण परेश रावल यांच्यावर टीका होते. अरूंधती राय यांना काश्मीरवर आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण उर्वरित कोट्यवधी भारतीयांनाही त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, असे अनेक ट्विट सोनूने केले आहेत.​ काही दिवसांपूर्वी सोनू निगम आपल्या एका ट्विटने चर्चेत आला होता. ‘मी मुस्लीम नाही, तरीही रोज सकाळी अजानमुळे माझी झोपमोड का? ही बळजबरी कधी थांबणार?’ असा सवाल सोनू निगमने  ट्विटरवर केला होता.  इस्लामची सुरुवात झाली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?, जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणाºया कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही, असे आणखी एक ट्विटही त्याने केले होते. त्याच्या या  ट्विटवरूनच मोठे वादंग माजले होते.