सलमानच्या ‘ट्यूबलाइट’मध्ये शाहरूख कॅमिओ करताना दिसेल अशी बातमी बºयाच दिवसांपासून पुढे येत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याची काहीसी झलकही बघावयास मिळाली आहे. मात्र त्याचा लुक कसा असेल याबाबत मात्र कमालीचा सस्पेन्स ठेवण्यात आला होता. परंतु उत्साही चाहत्यांनी निर्मात्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्याने सलमान नाराज झाला नसेल तरच नवल. फोटोंमध्ये अगदी स्पष्टपणे शाहरूख आणि सलमान हे दोघे सुपरस्टार बघावयास मिळत आहेत.
सुरुवातीला सांगण्यात आलेल्या माहितीनुसार शाहरूखने या भूमिकेसाठी चेहºयावर एक टॅटू बनविला होता. तो या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. शिवाय त्याचा लुकही स्पेशल असल्याचे त्याच्या वेशभूषेवरून स्पष्ट होते. तब्बल दहा वर्षांनंतर बॉलिवूडचे हे दोन सुपरस्टार ‘ट्यूबलाइट’मध्ये एकत्र स्क्रीन शेअर करताना बघावयास मिळणार आहेत. त्यामुळे रिलीज अगोदरच या दोघांचा चित्रपटातील लुक समोर आल्याने निर्मात्यांसाठी निश्चितच ही बाब निराशाजनक असेल.
या अगोदर शाहरूख आणि सलमान फराह खानच्या सुपरहिट ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात बघावयास मिळाले होते. त्यानंतर पुन्हा हे दोघे एकदाही एकत्र आले नाहीत. आता ‘ट्यूबलाइट’मध्ये हे दोघे पुन्हा एकत्र आले असून, शाहरूख यामध्ये जादूगारची भूमिका साकाणार आहे. जर या फोटोंच्या लीक होण्याचा अंदाज लावल्यास हे सर्व फोटो मिडल ईस्टमधून लीक होण्याची शक्यता आहे. कारण भारतात हा चित्रपट उद्या रिलीज होणार आहे.