Join us  

Shocking! बॉलिवू़डला आणखी एक मोठा झटका, सुशांत सिंग राजपूतने केले सुसाइड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 3:02 PM

1 / 16
टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. 
2 / 16
प्राप्त माहितीनुसार, नोकराने फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिस सुशांतच्या घरी पोहोचले आहेत. 
3 / 16
त्याच्या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. 
4 / 16
सुशांतने आत्महत्येसारखे इतके टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप कळू शकलेले नाही.
5 / 16
मात्र नैराश्यातून त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
6 / 16
सुशांत एक लोकप्रिय अभिनेता होता. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 
7 / 16
सुशांतने छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात केली.
8 / 16
किस देश में हे मेरा दिल’ ही त्याची पहिली मालिका होती. यानंतर एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतला संधी मिळाली आणि या एका संधीने त्याचे आयुष्य बदलले. 
9 / 16
या मालिकेने सुशांतला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती.
10 / 16
या मालिकेनंतर सुशांत बॉलिवूडकडे वळला होता.
11 / 16
‘काय पो छे’ या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते.
12 / 16
या चित्रपटानंतर शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात तो झळकला. पण बॉलिवूडमध्ये त्याला खरी ओळख दिली ती ‘एम एस धोनी-अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने. या सिनेमात त्याने भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एम. एस. धोनीची भूमिका साकारली होती.
13 / 16
त्याने धोनीची भूमिका पडद्यावर अशी काही जिवंत केली की, या सिनेमाने इतिहास रचला. हा सुशांतचा पहिला सुपरडुपर हिट सिनेमा होता.
14 / 16
या चित्रपटानंतर ‘केदारनाथ’ या सिनेमात तो सारा अली खानसोबत दिसला होता.
15 / 16
सोनचिडीया, छिछोरे या सिनेमातही त्याने काम केले.
16 / 16
टॅग्स :सुशांत सिंग रजपूतछिछोरेसोन चिरैया