ALSO READ : अभिषेक बच्चन करणार सतनाम सिंगची भूमिका तेही नि:शुल्क!
♦ आदर्श पत्नीच्या भूमिकेत ऐश :
अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही नेहमीच एक चांगली पत्नी आणि चांगली सून या भूमिकेतून स्वत:ला सिद्ध करत आलीय. बच्चन कुटुंबियांतील मान, मर्यादा, नियम यांच्यामध्ये राहूनच ती तिचे करिअर करते. मागील दोन वर्षात अभिषेक बच्चनचे ‘हॅप्पी न्यू ईअर’ आणि ‘हाऊसफुल्ल ३’, ‘आॅल इज वेल’ हे तिन्ही चित्रपट प्रदर्शित झाले पण, ते बॉक्स आॅफिसवर फार काही कमाल दाखवू शकले नाहीत. दुसरीकडे ऐश्वर्या रॉय बच्चन हिने ‘जज्बा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. त्यानंतर तिचे ‘सरबजीत’ आणि ‘ऐ दिल हैं मुश्किल’ हे दोन चित्रपट रिलीज झाले. मात्र, हे दोन्ही चित्रपट फार काही प्रेक्षकांची गर्दी खेचून आणू शकले नाहीत. ऐशच्या सासूबाई जया बच्चन यांनी तर तिला ‘ऐ दिल हैं मुश्किल’साठी ‘बेशर्म’ असे म्हटले. खरंतर, बच्चन कुटुंबियांना पाहिल्यावर असे वाटते की, ही फॅमिली एकदम परफेक्ट असेल. एकमेकांना जीव लावणारी, प्रेम करणारी एकमेकांना पाठिंबा देत सतत उभी असणारी मात्र, तसे नाही. ऐश्वर्यासाठी आजपर्यंत कधीही बच्चन कुटुंबीय उभे राहिले नाही, उलट तिला विरोधच केला.
ALSO READ : ऐश्वर्या रायसोबत काम करण्यास का दिला अभिषेक बच्चनने नकार!
♦ मुलगा व्हर्सेस सून :
मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासाठी त्यांची मुले अभिषेक आणि श्वेता नंदा हे जीव की प्राण आहेत तसेच नातवंडांचेही ते खुप लाड कोडकौतुक करतात. मात्र, कधीही त्यांनी ऐश्वर्या रॉय बच्चन हिच्याबद्दल ते केले नाही. श्वेता नंदा ही कॉलम लिहिते. तिचा असा कुठलाच कॉलम नाही ज्यावर बिग बी प्रतिक्रिया देत नाहीत. एवढेच काय, अभिषेक बच्चन याने ‘झूम बराबर झूम’ चित्रपटात एक इंटिमेट सीन दिला होता. त्यावर बिग बी काहीही म्हटले नाहीत. पण जेव्हा ऐशने हृतिक रोशनसोबत ‘धूम २’ मध्ये एक इंटीमेट सीन दिला होता तेव्हा आणि अलीकडेच ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मधील तिच्या रणबीर कपूरसोबतच्या इंटीमेट सीनबद्दल बच्चन कुटुंबियांनी खुप नाराजी व्यक्त केली. मुलगा आणि सून यांच्यात केलेला भेदभाव आपल्यापासून काही लपून राहिलेला नाहीये.
♦ सासूबार्इंना राग आला तरी ऐश राहते शांत :
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन हिने तिचा एक काळ गाजवला आहे. मात्र, जया बच्चन ही स्वभावाने अत्यंत तापट आहे. लगेचच तिला राग येतो. एकदा ऐश्वर्यासोबत असताना एका पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर जया बच्चन म्हणाली,‘ऐश काय म्हणता? ती काय तुमच्यासोबत शिकत होती का? त्यावर ऐश काहीही बोलली नाही.
♦ ‘ती’च्या कमबॅकला का शांत बच्चन कुटुंबीय?
ऐश्वर्या रॉय बच्चन हिने आराध्याच्या जन्मानंतर दोन वर्षांनी ‘जज्बा’मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचा विचार केला. सर्वांनी तिच्या कमबॅक बद्दल तिला शुभेच्छा दिल्या. तिचे प्रोत्साहन वाढवले. मात्र, तिच्या सर्व प्रयत्नांवर आणि करिअरबद्दल बच्चन कुटुंबीय पहिल्यापासूनच उदासीन असल्यासारखे दिसले.