बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:22 IST
1 / 10ही अभिनेत्री गेल्या बऱ्याच काळापासून कोणत्याही शो, चित्रपट किंवा वेबसीरीजमध्ये दिसलेली नाही, परंतु सोशल मीडियावर ती खूप सक्रीय असते.2 / 10अभिनेत्री शमा सिकंदर नेहमीच चर्चेत असते. ही अभिनेत्री गेल्या बऱ्याच काळापासून कोणत्याही शो, चित्रपट किंवा वेबसीरीजमध्ये दिसलेली नाही, परंतु सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.3 / 10शमा सिकंदर अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळत आहे, कारण ही अभिनेत्री आता आई झाली आहे.4 / 10शमा सिकंदर वयाच्या ४४ व्या वर्षी आई झाली आहे. तिने सोशल मीडियावर आपल्या या छोट्या परीसोबतचे फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.5 / 10फोटोमध्ये शमा सिकंदर आपल्या लाडक्या लेकीला कडेवर घेऊन दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''माझे आयुष्य सध्या काहीसं असं चाललं आहे.''6 / 10मात्र, शमा सिकंदरने याबद्दल खुलासा केलेला नाही की, तिने या मुलीला जन्म दिला आहे की दत्तक घेतले आहे.7 / 10शमाच्या चाहत्यांना अपेक्षा आहे की, अभिनेत्री लवकरच याबद्दल अधिकृतपणे सांगेल की तिने मुलीला दत्तक घेतले आहे की जन्म दिला आहे.8 / 10शमा सिकंदर अनेक वर्षांपासून पडद्यापासून दूर आहे. अभिनेत्री पुनरागमन करण्याची योजना आखत आहे, पण तिला अद्याप काही खास ऑफर मिळालेली नाही.9 / 10शमा सिकंदरने आपल्यापेक्षा ४ वर्षांनी लहान असलेल्या जेम्स मिलिरॉनसोबत लग्न केले आहे. लग्नापूर्वी या दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले होते, त्यानंतर गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले होते.10 / 10शमाचा पती जेम्स हा बिझनेसमन आहे जो कामानिमित्त विदेशात जात असतो. मात्र, तो आपला बहुतेक वेळ पत्नीसोबत मुंबईतच व्यतित करतो.