By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 17:59 IST
1 / 8किंग खानची लेक सुहाना खान (Suhana Khan) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सुहानाने तिच्या लुक्सने सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. सुहानाचा बदललेला लुक पाहून सर्वच आश्चर्यचकित झालेत.2 / 8सुहाना खान 'आर्चीज' सिनेमातून पदार्पण करत आहे. झोया अख्तर या सिनेमातून स्टारकिड्सला लाँच करत आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, सुहाना खान आणि श्रीदेवी यांची धाकटी लेक खुशी कपूर यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.3 / 8'पठाण' आणि 'जवान'मुळे शाहरुख खान चर्चेत आहेच आता त्याची लेकही बॉलिवूडवर अधिराज्य गाजवायला येत आहे. गौरी खानने सुहानाला चांगल्या प्रकारे ग्रुम केलं आहे. सुहानाचं मन्नतमधील फोटोशूट हे आई गौरी खानच अनेकदा करत असते.4 / 8सुहाना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. याआधी तिचं प्रायव्हेट अकाऊंट होतं. मात्र आता तिने ते पब्लिक केलं आहे. बघता बघता तिचे ४० लाख फॉलोअर्स झाले आहेत. 5 / 8सुहानाने नुकतंच एका फोटोतून चाहत्यांना घायाळ केलंय. तिच्या या नवीन फोटोशूटसमोर अनन्या पांडे, जान्हवी, सारा या स्टारकीड्सही फिक्या आहेत.6 / 8सुहानाने स्ट्रीप शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट केलंय. यातील तिची नजर पाहून चाहते घायाळ झालेत. तसंच तिची पोजही किलर आहे. अगदी प्रोफेशनल मॉडेलसारखं तिने हे फोटोशूट केलंय. शिवाय सुहानाचा न्यूड मेकअपही तिच्या सुंदरतेत भर टाकतो.7 / 8याआधीही सुहानाने असे बोल्ड फोटोशूट केले आहे. ब्लॅक अँड रेड फ्लोरल प्रिंटेड गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा ड्रेस तब्बल २ लाख रुपयांचा असल्याचीही चर्चा झाली होती.8 / 8७ डिसेंबरला सुहानाचा 'द आर्चीज' सिनेमा रिलीज होतोय. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा पाहता येणार आहे. सुहानाचा हा ओटीटी डेब्यूही असणार आहे.