शाहरूख व सुहाना विमानतळावर दाखल होताच, लोकांनी एकच गर्दी केली. या बाप-लेकीला पाहण्यासाठी आणि त्यांची एक छबी आपल्या कॅमेºयात टीपण्यासाठी एकच झुंबड उडाली. मग काय, सुहानाला कार मधून उतरल्यापासून पूर्णवेळ शाहरूख तिला प्रोटेक्ट करताना दिसला. मीडियापासून सुहानाला दूर ठेवण्यासाठीची त्याची धडपडही यावेळी दिसली. गेल्या काही दिवसांपासून सुहाना सोशल मीडियावर बरीच ट्रेंड होतेय. शाहरूख यावरून बराच चिंतीत दिसतो.
ALSO READ : सुहाना पोहोचली करण जोहरच्या घरी? ही बॉलिवूड डेब्यूची तयारी तर नाही?
सुहानाला अभिनय प्रचंड आवडतो. ती थिएटरही करीत आहे. शाहरूखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, जर सुहाना माझ्यापेक्षा पाच पटीने काम करण्याची तयारी ठेवत असेल अन् त्यानंतरही दहा पटीने कमी मानधन घेण्यास तयार असेल तर ती अभिनेत्री बनू शकते. मला असे वाटतेय की तिने अभिनेत्रींना होताना प्रत्येक संकटाचा सामना करायला हवा. माझ्या सहयोगी अभिनेत्री ज्या पद्धतीने स्ट्रगल करून स्वत:ला सिद्ध करतात अगदी त्याच पद्धतीने तिनेही त्या सर्व अडचणींवर मात करणे अपेक्षित आहे. यासाठी जर तिची तयारी असेल तरच तिने अभिनय क्षेत्रात काम करण्याचा विचार करावा.