या पार्टीत युलिया ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसली. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, या पार्टीत युलिया व प्रिती झिंटा या दोघीही दिसल्या. अगदी काही दिवसांपूर्वी ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सलमान व प्रिती झिंटा एकाच गाडीतून पोहोचले होते. याऊलट युलिया वेगळ्या गाडीतून आली होती. पण या पार्टीत युलिया व प्रिती एकत्र आल्यात.
सलमान खान आणि युलिया वेंटर यांच्यात नेमके सुरु आहे तरी काय? हा प्रश्न अर्थात अद्यापही अनुत्तरित आहे. दोघांचेही ब्रेकअप झाल्याच्या बातम्या असताना अचानक हे दोघे एकत्र दिसतात आणि मग पुन्हा चर्चेचा बाजार गरम होतो. अद्यापही सलमान वा युलिया या दोघांनी आपले नाते जाहिर केलेले नाही. काही महिन्यांपूर्वी अलीकडे सलमान व युलिया दोघेही संपूर्ण कुटुंबासोबत मालदीव येथे हॉली डे एन्जॉय करताना दिसले होते. अनेक पार्ट्यांना दोघेही एकत्र दिसतात. पण तरिही दोघेही रिलेशनशिपवर बोलायला तयार नाहीत. आता खरे काय, हे युलिया व सलमानलाच ठाऊक़ पण युलियाने सलमानच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे, हे मात्र नक्की.